कोकण रेल्वे महामंडळ लिमिटेड (Konkan Railway Corporation Limited – KRCL) अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 201 रिक्त पदे भरली जाणार असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. रेल्वे क्षेत्रात नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची संधी मानली जात आहे. इच्छुक उमेदवारांना 28 सप्टेंबर 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
या भरतीमध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य व यांत्रिक), ट्रॅक मेंटेनर, वरिष्ठ विभाग अभियंता (S&T व यांत्रिक), ESTM-III, विभाग नियंत्रक, स्थानक प्रमुख (Station Master), मालगाडी व्यवस्थापक (Goods Train Manager), सहाय्यक लोको पायलट, तंत्रज्ञ-III (यांत्रिक) तसेच वाणिज्यिक पर्यवेक्षक अशा विविध पदांचा समावेश करण्यात आला आहे. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता संबंधित पदाच्या आवश्यकतेनुसार असणार असून सविस्तर माहिती अधिकृत जाहिरातीत उपलब्ध आहे.
या भरतीसाठी उमेदवारांचे वय 18 ते 45 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन स्वरूपात होणार असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
पदनिहाय रिक्त जागांचा तपशील
| पदाचे नाव | पदसंख्या |
|---|---|
| कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 25 |
| ट्रॅक मेंटेनर | 57 |
| वरिष्ठ विभाग अभियंता (S&T) | 05 |
| ESTM-III | 15 |
| विभाग नियंत्रक | 09 |
| स्थानक प्रमुख | 15 |
| मालगाडी व्यवस्थापक | 10 |
| सहाय्यक लोको पायलट | 30 |
| वरिष्ठ विभाग अभियंता (यांत्रिक) | 06 |
| कनिष्ठ अभियंता (यांत्रिक) | 07 |
| तंत्रज्ञ-III (यांत्रिक) | 15 |
| वाणिज्यिक पर्यवेक्षक | 07 |
| एकूण | 201 |
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| कनिष्ठ अभियंता (Civil) | संबंधित शाखेतील इंजिनिअरिंग डिप्लोमा |
| कनिष्ठ अभियंता (Mechanical) | संबंधित शाखेतील इंजिनिअरिंग डिप्लोमा |
| वरिष्ठ विभाग अभियंता (S&T) | संबंधित शाखेतील B.E./B.Tech |
| वरिष्ठ विभाग अभियंता (Mechanical) | संबंधित शाखेतील B.E./B.Tech |
| ESTM-III | 10वी/SSLC + ITI (Electrician, Wireman, Electronics Mechanic इ.) किंवा 12वी (Physics & Maths) |
| विभाग नियंत्रक (Section Controller) | कोणत्याही शाखेतील पदवी |
| स्थानक प्रमुख (Station Master) | कोणत्याही शाखेतील पदवी |
| मालगाडी व्यवस्थापक (Goods Train Manager) | कोणत्याही शाखेतील पदवी |
| सहाय्यक लोको पायलट (ALP) | 10वी + ITI / संबंधित तांत्रिक पात्रता |
| तंत्रज्ञ-III (Mechanical) | 10वी + ITI |
| ट्रॅक मेंटेनर | 10वी उत्तीर्ण |
| वाणिज्यिक पर्यवेक्षक | कोणत्याही शाखेतील पदवी |
वेतनश्रेणी
कोकण रेल्वेच्या या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 7th CPC नुसार आकर्षक वेतन दिले जाणार आहे. वरिष्ठ विभाग अभियंता पदासाठी प्रारंभिक वेतन ₹44,900, कनिष्ठ अभियंता, स्थानक प्रमुख, विभाग नियंत्रक आणि वाणिज्यिक पर्यवेक्षक पदांसाठी ₹35,400, मालगाडी व्यवस्थापक पदासाठी ₹29,200, तर सहाय्यक लोको पायलट, ESTM-III आणि तंत्रज्ञ-III पदांसाठी ₹19,900 प्रारंभिक वेतन निश्चित करण्यात आले आहे. ट्रॅक मेंटेनर पदासाठी प्रारंभिक वेतन ₹18,000 राहणार आहे.
महत्त्वाची माहिती
| घटक | तपशील |
|---|---|
| संस्था | कोकण रेल्वे महामंडळ लिमिटेड |
| एकूण पदे | 201 |
| अर्ज पद्धती | ऑनलाइन |
| वयोमर्यादा | 18 ते 45 वर्षे |
| नोकरीचे ठिकाण | कोकण रेल्वे कार्यक्षेत्र |
| अर्जाची अंतिम तारीख | 28 सप्टेंबर 2026 |
| अधिकृत संकेतस्थळ | konkanrailway.com |
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पात्रता, अनुभव, आरक्षण नियम, निवड प्रक्रिया आणि इतर अटींची माहिती अधिकृत जाहिरातीतून तपासून घ्यावी. अर्ज अंतिम तारखेपूर्वी सादर करणे आवश्यक आहे. रेल्वे क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती उत्तम संधी ठरू शकते.
| PDF जाहिरात | https://shorturl.at/B565J |
| ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/O3w3T |
| अधिकृत वेबसाईट | https://konkanrailway.com/ |
कोकण रेल्वेत १३४ प्रशिक्षणार्थी पदांची भरती; जमीन गमावलेल्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य | Konkan Railway Recruitment 2026
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडअंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीमध्ये पदवीधर, तंत्रज्ञ-पदविका तसेच सामान्य शाखेतील पात्र उमेदवारांना संधी मिळणार असून एकूण १३४ प्रशिक्षणार्थी जागा उपलब्ध आहेत. ही भरती एक वर्षाच्या Apprenticeship Training साठी असून उमेदवारांची निवड प्रामुख्याने गुणवत्तेच्या आधारे केली जाणार आहे. कोकण रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर भरतीसंबंधी सूचना प्रसिद्ध करण्यात येतात.
पदे आणि जागा
| पद/शाखा | जागा |
|---|---|
| BE/B.Tech – Civil | 24 |
| BE/B.Tech – Electrical | 18 |
| BE/B.Tech – Electronics | 8 |
| BE/B.Tech – Mechanical | 10 |
| Diploma – Civil | 20 |
| Diploma – Electrical | 12 |
| Diploma – Electronics | 7 |
| Diploma – Mechanical | 15 |
| General Stream Graduates | 20 |
| एकूण | 134 |
पदवीधर प्रशिक्षणार्थींसाठी Civil, Electrical, Electronics आणि Mechanical Engineeringमधील BE/B.Tech पात्रता, तर Technician Apprentice साठी संबंधित शाखेतील Diploma आवश्यक आहे. General Stream Graduatesमध्ये BA, B.Sc., B.Com., BBA, BMS, BJMC आणि BBS यांसारख्या पदवींचा समावेश आहे.
उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्षे असणे आवश्यक आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत लागू आहे. तसेच संबंधित पात्रता पूर्ण केलेले आणि आवश्यक NATS नोंदणी असलेले उमेदवारच प्रक्रियेसाठी पात्र ठरतात.
गुणवत्तेवर निवड
या भरतीमध्ये परीक्षेऐवजी शैक्षणिक गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे. सर्व वर्षे किंवा सत्रांतील गुणांची बेरीज करून एकूण टक्केवारी काढली जाईल. कोणत्याही विशिष्ट वर्षाला अतिरिक्त भारांक दिला जाणार नाही आणि गुणांचे rounding off केले जाणार नाही. समान गुण असल्यास अधिक वय असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.
विशेष म्हणजे, कोकण रेल्वे प्रकल्पासाठी जमीन गमावलेल्या उमेदवारांना निवडीत प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानंतर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर व दक्षिण गोवा तसेच उत्तर कन्नड, उडुपी आणि दक्षिण कन्नड या KRCL कार्यक्षेत्रातील जिल्ह्यांतील उमेदवारांना दुसरे प्राधान्य देण्यात येणार आहे.
कागदपत्र पडताळणी
कागदपत्र पडताळणी २४, २५, २७ आणि २८ ऑगस्ट २०२६ रोजी नवी मुंबई येथे होणार आहे. ठिकाण — एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल विहार, सेक्टर-४०, सीवूड्स रेल्वे स्थानकासमोर (पश्चिम), नवी मुंबई – ४००७०६.
उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रांसह आवश्यक स्व-साक्षांकित प्रती घेऊन उपस्थित राहणे आवश्यक आहे. शैक्षणिक गुणपत्रिका, पदवी/पदविका प्रमाणपत्र, दहावीचे प्रमाणपत्र, NATS संबंधित कागदपत्रे आणि लागू असल्यास जात, अधिवास व जमीन गमावल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
महत्त्वाचे: प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर KRCLमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळण्याचा हक्क निर्माण होत नाही. Apprenticeshipचा कालावधी एक वर्षाचा आहे.
| PDF जाहिरात | https://lnk.ua/aDFdKDoBw |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://konkanrailway.com/ |
कोकण रेल्वे अंतर्गत कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदाची 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. कोकण रेल्वे भरती 2026 करीता इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २५ ऑगस्ट २०२६ आहे.
- पदाचे नाव – कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक
- पदसंख्या – 08 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 35 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, सीवूड्स रेल्वे स्थानकाजवळ, सेक्टर-४०, सीवूड्स (पश्चिम), नवी मुंबई
- मुलाखती तारीख – २५ ऑगस्ट २०२६
- अधिकृत वेबसाईट – https://konkanrailway.com/
KRCL Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक | 08 |
Salary Details For KRCL Application 2026
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक | Rs. 41380 – 47220/- Per Month |
Selection Process For KRCL Recruitment 2026
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
- मुलाखतीची तारीख २५ ऑगस्ट २०२६ आहे.
- अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
| PDF जाहिरात | https://lnk.ua/gRwLpJwmt |
| अधिकृत वेबसाईट | https://konkanrailway.com/ |
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (Konkan Railway Recruitment 2026) अंतर्गत विविध तांत्रिक आणि सुरक्षा विभागातील एकूण 40 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार असून, इच्छुक उमेदवारांनी निर्धारित तारखांना मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या भरती प्रक्रियेत ज्युनियर टेक्निकल असिस्टंट, सिनियर टेक्निकल असिस्टंट, टेक्निशियन, सीएनसी मशीन ऑपरेटर, नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग टेक्निशियन, वेल्डर, सेफ्टी ऑफिसर यांसह विविध पदांचा समावेश करण्यात आला आहे. संबंधित पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ही पदाच्या स्वरूपानुसार वेगवेगळी असून, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा न घेता थेट मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे संबंधित क्षेत्रातील पात्रता आणि अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी मानली जात आहे.
भरतीचा संक्षिप्त तपशील : Konkan Railway Recruitment 2026
| बाब | माहिती |
|---|---|
| भरती संस्था | कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) |
| एकूण पदसंख्या | 40 |
| निवड प्रक्रिया | थेट मुलाखत |
| मुलाखतीच्या तारखा | 21 ते 24 जुलै 2026 |
| मुलाखतीचे ठिकाण | पी. एम. श्री जवाहर नवोदय विद्यालय, वसमतनगर, जि. हिंगोली |
भरतीअंतर्गत उपलब्ध पदे
या भरतीमध्ये खालील पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- ज्युनियर टेक्निकल असिस्टंट – मॅन्युफॅक्चरिंग अँड मेंटेनन्स
- सिनियर टेक्निकल असिस्टंट – मेंटेनन्स
- ज्युनियर टेक्निकल असिस्टंट – सिव्हिल
- सिनियर टेक्निकल असिस्टंट – सिव्हिल
- ईओटी / फोर्क लिफ्ट / टंग ऑपरेटर
- टेक्निशियन (फिटर)
- सीएनसी मशीन ऑपरेटर
- नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग टेक्निशियन
- फिटर मेकॅट्रॉनिक्स मेंटेनन्स
- टेक्निशियन (वेल्डर)
- सेफ्टी ऑफिसर
शैक्षणिक पात्रता
प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि इतर अटी वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे उमेदवारांनी संबंधित पदासाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचावी. पात्रता पदानुसार निश्चित करण्यात आली आहे.
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड वॉक-इन इंटरव्ह्यू म्हणजेच थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी जाहिरातीत नमूद केलेल्या तारखेनुसार आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीच्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचे ठिकाण
पी. एम. श्री जवाहर नवोदय विद्यालय,
वसमतनगर, जिल्हा हिंगोली
महत्त्वाच्या तारखा
| तपशील | माहिती |
|---|---|
| मुलाखतीचा कालावधी | 21 ते 24 जुलै 2026 |
अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा
- निवड प्रक्रिया पूर्णपणे मुलाखतीद्वारे होणार आहे.
- उमेदवारांनी सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या प्रती सोबत आणाव्यात.
- संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर अटी अधिकृत जाहिरातीत तपासाव्यात.
- मुलाखतीसाठी निश्चित तारखेला आणि वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी आणि पदनिहाय पात्रता, अनुभव तसेच इतर अटी जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी कोकण रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरील भरतीची PDF जाहिरात अवश्य वाचावी.
| PDF जाहिरात | https://lnk.ua/JvKMeVhro |
| अधिकृत वेबसाईट | https://konkanrailway.com/ |
