Latur Anganwadi Bharti 2026 | लातूर अंगणवाडी भरती 17 जुलैपर्यंत ऑफलाईन अर्ज करा; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

बाल विकास सेवा योजना प्रकल्प, लातूर अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस (Latur Anganwadi Bharti 2026) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 14 रिक्त पदांसाठी पात्र महिला उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. अंगणवाडी क्षेत्रात नोकरीची संधी शोधणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची संधी मानली जात आहे.

या भरतीमध्ये अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदांचा समावेश असून, उमेदवारांनी संबंधित पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर माहिती अधिकृत जाहिरातीत देण्यात आली असून, अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

भरतीची महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे : Latur Anganwadi Bharti 2026

तपशीलमाहिती
भरती विभागबाल विकास सेवा योजना प्रकल्प, लातूर
पदाचे नावअंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस
एकूण पदसंख्या14
नोकरीचे ठिकाणलातूर
अर्ज पद्धतऑफलाईन
वयोमर्यादा18 ते 35 वर्षे
विधवा महिलांसाठी कमाल वयोमर्यादा40 वर्षे
अर्ज करण्याची अंतिम तारीख17 जुलै 2026

या भरतीसाठी अर्ज केवळ ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज निर्धारित नमुन्यात भरून आवश्यक कागदपत्रांसह खालील पत्त्यावर सादर करावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :
बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, लातूर (ग्रामीण), तालुका लातूर, जिल्हा लातूर.

उमेदवारांनी अर्ज अंतिम तारखेपूर्वी संबंधित कार्यालयात पोहोचेल याची विशेष काळजी घ्यावी. 17 जुलै 2026 नंतर प्राप्त होणारे अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाहीत. तसेच अंतिम तारखेनंतर कोणत्याही प्रकारची अतिरिक्त कागदपत्रे स्वीकारली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

पोस्टाच्या विलंबामुळे अंतिम तारखेनंतर कार्यालयात प्राप्त झालेल्या अर्जांचाही विचार केला जाणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता वेळेत अर्ज सादर करावा. अर्ज पाठविताना सर्व आवश्यक कागदपत्रे पूर्ण असल्याची खात्री करूनच अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

भरती प्रक्रियेसंदर्भातील शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रिया तसेच इतर अटी व शर्तींबाबत सविस्तर माहिती अधिकृत PDF जाहिरातीत उपलब्ध आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून सर्व माहितीची खात्री करावी.

PDF जाहिरातhttps://lnk.ua/KUcvP2KhK
अधिकृत वेबसाईटlatur.gov.in

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा