Maharashtra SSC Result 2025: महाराष्ट्र राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं (MSBSHSE) दहावीचा (SSC) निकाल आज, मंगळवार 13 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांना आणि पालकांना आश्चर्याचा सुखद धक्का देत बोर्डाने नियोजित वेळेपूर्वीच निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.
बोर्डाचे सचिव देविदास कुलाळ यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात, फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये पार पडलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन स्वरूपात जाहीर केला जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
Maharashtra SSC Result 2025

निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे: Maharashtra SSC Result 2025
- https://mahresult.nic.in
- http://sscresult.mkcl.org
- https://sscresult.mahahsscboard.in
- https://results.digilocker.gov.in
निकाल पाहण्यासाठी सोप्या स्टेप्स:
- mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- ‘महाराष्ट्र एसएससी निकाल 2025’ या लिंकवर क्लिक करा.
- आपला रोल नंबर आणि इतर आवश्यक माहिती भरून सबमिट करा.
- तुमचा निकाल स्क्रीनवर झळकणार – तो काळजीपूर्वक तपासा.
- निकालाची प्रत डाउनलोड करा व सुरक्षित ठेवा.
अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन
या निकालानंतर अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया तातडीने सुरू होणार असून, विद्यार्थ्यांना यासाठी कॉलेज ते कॉलेज धावपळ करण्याची आवश्यकता यंदा भासणार नाही. कारण महाराष्ट्र बोर्डाने यंदा अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
अकरावी प्रवेशासाठी अधिकृत संकेतस्थळ:
https://mahafyjcadmissions.in
बोर्डाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. याद्वारे प्रवेश प्रक्रिया पारदर्शक, सोपी आणि सुलभ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, निकाल जाहीर होण्यापूर्वीच मंगळवारी सकाळी 11 वाजता राज्य मंडळाच्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली असून, त्यात अधिक तपशील जाहीर होणार आहेत.
आजच्या या निकालानं अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नवी दिशा ठरणार आहे. सर्व विद्यार्थी व पालकांना Workmore परिवाराकडून कडून शुभेच्छा!
