Metro Railway Bharti 2025: १०वी पास उमेदवारांसाठी नोकरी शोधत असाल तर कोलकत्ता मेट्रो रेल्वेची ही भरती तुमच्यासाठी मोठी संधी ठरू शकते. मेट्रो रेल्वे कोलकत्ताने अॅक्ट अप्रेंटिस पदांसाठी एकूण १२८ जागांची भरती जाहीर केली आहे. या संदर्भातील अधिसूचना अधिकृतरीत्या जारी करण्यात आली असून उमेदवार २३ डिसेंबर २०२५ पासून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जानेवारी २०२६ अशी ठरवण्यात आली आहे.
मेट्रो रेल्वेने ही भरती फिटर, इलेक्ट्रिशियन, मशीनीस्ट आणि वेल्डर या विविध ट्रेडमध्ये जाहीर केली आहे. यासाठी १५ ते २४ वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र असून राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारनुसार वयोमर्यादेत सवलत मिळणार आहे. तसेच या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा किंवा मुलाखत होणार नाही. निवड प्रक्रिया पूर्णपणे मेरिट लिस्टवर आधारित असेल.
आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. या भरतीसाठी सर्व तपशील आणि अधिसूचना mtp.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.
उपलब्ध जागांची माहिती (Vacancy Details)
| ट्रेड | जागा |
|---|---|
| फिटर | 82 |
| इलेक्ट्रिशियन | 28 |
| मशीनीस्ट | 09 |
| वेल्डर | 09 |
| एकूण | 128 |
अर्ज कसा करावा? – Apply for Metro Railway Bharti 2025
- प्रथम www.apprenticeshipindia.gov.in या पोर्टलवर नोंदणी करा.
- त्यानंतर कोलकत्ता मेट्रोच्या अधिकृत वेबसाइटवर mtp.indianrailways.gov.in येथे जा आणि अर्ज फॉर्म भरा.
- वैयक्तिक माहिती, जन्मतारीख, शैक्षणिक कागदपत्रे, फोटो आणि सही अपलोड करा.
- योग्य फी भरल्यानंतर अर्ज सबमिट करा आणि प्रिंटआउट जतन करून ठेवा.
