पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित(PDCC Bank Application Form)यांनी शिपाई (Peon) पदांच्या भरतीसाठी मोठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण २८९ रिक्त पदे सरळसेवेद्वारे भरली जाणार आहेत. यासंदर्भातील अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करता येणार असून अर्ज प्रक्रिया ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजल्यापासून सुरू झाली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे.
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क म्हणून १,६५० रुपये भरावे लागणार असून त्यावर १८ टक्के जीएसटी आणि लागू असलेले सर्व्हिस चार्ज स्वतंत्रपणे भरावे लागतील. अर्ज ऑनलाइन माध्यमातूनच स्वीकारले जाणार आहेत. भरती प्रक्रियेची लेखी परीक्षा ऑफलाइन OMR पद्धतीने घेण्यात येणार असून परीक्षेचे वेळापत्रक आणि प्रवेशपत्र बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.
भरतीचा संक्षिप्त तपशील : PDCC Bank Application Form
| बाब | माहिती |
|---|---|
| संस्थेचे नाव | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (PDCC Bank) |
| पदाचे नाव | शिपाई (Peon) |
| पदसंख्या | २८९ |
| अर्ज पद्धत | ऑनलाइन |
| अर्ज सुरू | ४ ऑगस्ट २०२६ |
| अर्जाची अंतिम तारीख | १० ऑगस्ट २०२६ (रात्री ११.५९ पर्यंत) |
| परीक्षा शुल्क | ₹१,६५० + १८% जीएसटी + सर्व्हिस चार्ज |
| अधिकृत संकेतस्थळ | https://pdcc.bank.in |
शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी १ ऑगस्ट २०२६ रोजीपर्यंत किमान उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता १२ वी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. तसेच समकक्ष पदविका (Diploma) धारक उमेदवारांनाही अर्ज करता येणार आहे. पदाच्या आवश्यकतेनुसार इतर अटींसाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
वयोमर्यादेबाबत १ ऑगस्ट २०२६ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३८ वर्षे असणे आवश्यक आहे. मात्र, PDCC बँकेत कंत्राटी तत्त्वावर सलग तीन वर्षे सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना कमाल वयोमर्यादेत सवलत देण्यात आली असून त्यांच्यासाठी कमाल वय ४३ वर्षे निश्चित करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्याचा रहिवासी असणे बंधनकारक
या भरतीमधील सर्वात महत्त्वाची अट म्हणजे अर्जदार हा पुणे जिल्ह्याचा किमान १५ वर्षांचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे. उमेदवारांकडे सन २०१८ नंतर सक्षम प्राधिकरणाने दिलेले अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) असणे अनिवार्य आहे. तसेच उमेदवाराला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया कशी असेल?
शिपाई पदासाठी निवड प्रक्रिया एकूण १०० गुणांवर आधारित असेल. यामध्ये प्रथम ७० गुणांची ऑफलाइन OMR आधारित लेखी परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा मराठी माध्यमातून होणार असून परीक्षेत ७० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. परीक्षेसाठी उमेदवारांना ७५ मिनिटांचा कालावधी दिला जाईल.
लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे असेल.
| विषय | गुण |
| शेती पतपुरवठा त्रिस्तरीय रचना | २० |
| बँकिंग व सहकार | १५ |
| सामान्य ज्ञान व चालू घडामोडी | १५ |
| कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था | १० |
| बुद्धिमत्ता चाचणी | १० |
| एकूण | ७० |
हेही वाचा : National AYUSH Mission Bharti 2026 | सरकारी नोकरीची संधी! राष्ट्रीय आयुष अभियानात विवध पदांसाठी भरती सुरू; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती
जर्मनीमध्ये करिअरची सुवर्णसंधी! ‘मॅजिक बिलियन’च्या माध्यमातून भारतीय तरुणांना प्रशिक्षणासह लाखोंच्या पगाराची संधी | Germany Jobs 2026
लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार रिक्त पदांच्या १:३ या प्रमाणात उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात येईल. त्यानंतर ३० गुणांची मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीमध्ये उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व, संवाद कौशल्य, बँकिंगविषयक माहिती तसेच पुणे जिल्ह्याचे स्थानिक ज्ञान तपासण्यात येणार आहे.
वेतन आणि नियुक्ती
अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची सुरुवातीला सहा महिन्यांसाठी तात्पुरत्या परिविक्षाधीन (प्रोबेशनरी) कालावधीवर नियुक्ती करण्यात येईल. या कालावधीत दरमहा १२,००० रुपये इतके एकवट मानधन दिले जाईल. परिविक्षाधीन कालावधी यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर बँकेच्या सेवानियमानुसार नियमित वेतनश्रेणी (१९५-१०-२२५… ते ११७०) तसेच नियमानुसार इतर भत्त्यांचा लाभ मिळणार आहे.
प्रतीक्षा यादीही तयार होणार
या भरतीमध्ये अंतिम निवड यादीसोबतच एकूण निवड झालेल्या उमेदवारांच्या २० टक्के उमेदवारांची प्रतीक्षा यादी (Waiting List) देखील तयार करण्यात येणार आहे. ही प्रतीक्षा यादी एका वर्षासाठी वैध राहणार आहे.
अर्ज करताना आवश्यक सूचना
ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवारांनी स्वतःचे अलीकडील छायाचित्र, स्वाक्षरी, आधार कार्ड आणि अधिवास प्रमाणपत्र नियमानुसार अपलोड करणे बंधनकारक आहे. कोणत्याही उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास त्याचे सर्व अर्ज बाद करण्यात येतील. त्यामुळे उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक भरून अंतिम मुदतीपूर्वी ऑनलाइन अर्ज सादर करावा. भरतीसंदर्भातील सर्व अद्ययावत माहिती, प्रवेशपत्र आणि पुढील सूचना बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
| PDF जाहिरात | https://lnk.ua/8Y013THqk |
| ऑनलाईन अर्ज करा | https://lnk.ua/nVkOdmH37 |
| अधिकृत वेबसाईट | https://pdcc.bank.in/ |
