महाराष्ट्र पोलिस भरती अर्ज करण्यास मुदतवाढ: तब्बल 15631 पदांसाठी अर्ज करण्याची ‘ही’ असेल अंतिम तारीख, संधी चुकवू नका | Police Recruitment 2025

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

Police Recruitment 2025: महाराष्ट्र पोलिस दलातील तब्बल 15631 पदांची मोठी भरती आता अंतिम टप्प्यात आली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2025 करण्यात आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर कॉन्स्टेबल, जेल कॉन्स्टेबल, SRPF कॉन्स्टेबल आणि बँड्समन अशा विविध पदांसाठी ही भरती होत आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस भरती सन २०२४-२५ साठी अर्ज भरण्यासाठी विशेष बाब म्हणून ही मुदतवाढ देण्यात येत आहे. उमेदवारांनी पात्रता निकष तपासून तात्काळ अर्ज करण्याचे आवाहन पोलिस विभागाकडून करण्यात आले आहे.

महत्वाच्या तारखा – Police Recruitment 2025

अधिसूचनेनुसार भरतीची प्रक्रिया 29 ऑक्टोबरपासून सुरू झाली असून दिनांक 07 डिसेंबर 2025 पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील. अर्ज शुल्क भरण्याची अखेरची तारीख 10 डिसेंबर 2025 आहे. त्यामुळे त्वरित अर्ज करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

पदांची माहिती व पात्रता – Maharashtra Police

या भरतीत बहुसंख्य पदे पोलीस कॉन्स्टेबल वर्गातील असून सर्व पदांसाठी किमान शैक्षणिक पात्रता १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच वय १८ ते २८ वर्षांदरम्यान असणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार आरक्षण लागू राहील.

पदरिक्त जागापात्रतावयोमर्यादा
पोलीस कॉन्स्टेबल12,39912वी पास18–28 वर्षे
ड्रायव्हर कॉन्स्टेबल23412वी पास + कौशल्य चाचणी18–28 वर्षे
जेल कॉन्स्टेबल58012वी पास18–28 वर्षे
SRPF कॉन्स्टेबल2,39312वी पास18–28 वर्षे
बँड्समन2512वी पास18–28 वर्षे

सर्व उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.

अर्ज कसा करावा?

भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी mahapolice.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी करताना वैध मोबाईल क्रमांक व ईमेल आयडीचा वापर करणे आवश्यक आहे. त्यानंतर वैयक्तिक, शैक्षणिक आणि संपर्क माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
अर्ज शुल्क सर्वसाधारण प्रवर्गासाठी ₹४५०, तर SC/ST/OBC/दिव्यांग उमेदवारांसाठी ₹३५० निश्चित करण्यात आले आहे.

निवड प्रक्रिया कशी असेल?

महाराष्ट्र पोलिस भरतीतील निवड प्रक्रिया चार टप्प्यांत होत आहे:

  1. शारीरिक चाचणी (PET/PST): सर्व उमेदवारांना प्रथम शारीरिक कार्यक्षमता आणि शारीरिक मापदंड चाचणी उत्तीर्ण करावी लागेल.
  2. लेखी परीक्षा: PET/PST उत्तीर्ण उमेदवारांसाठी पुढील टप्पा लेखी परीक्षा असून यात सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता आणि मूलभूत गणित क्षमता तपासली जाते.
  3. कौशल्य चाचणी (ड्रायव्हरसाठी): चालक पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची अतिरिक्त कौशल्य चाचणी घेतली जाईल.
  4. अंतिम मेरिट: सर्व टप्प्यांतील गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.

उमेदवारांसाठी महत्वाचा सल्ला

अनेकदा अंतिम दिवशी सर्व्हर डाऊन होणे, संकेतस्थळ धीमे होणे अशा समस्या उद्भवतात. त्यामुळे अर्ज शेवटच्या दिवशी न करता शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याची विनंती विभागाने केली आहे. भरतीसंबंधी पुढील अद्यतने व सूचनांसाठी अधिकृत संकेतस्थळाला नियमित भेट द्यावी, असेही सांगण्यात आले आहे.

DistrictNo Of vacancyPDF
जालना पोलीस विभाग अंतर्गत “पोलीस शिपाई” भरती156Download
सोलापूर ग्रामीण पोलीस “पोलीस शिपाई” पदाकरिता ऑनलाईन अर्ज करा90Download
सोलापूर पोलीस विभाग अंतर्गत रिक्त पदांची भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती79Download
पालघर पोलीस भरती अंतर्गत ‘पोलीस शिपाई’ पदाची जाहिरात प्रकाशित202Download
बीड पोलीस दलात कॉन्स्टेबलच्या जागा रिक्त; जाणून घ्या सविस्तर माहिती174Download
पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी अंतर्गत ‘पोलीस शिपाई चालक’ पदांकरिता भरती08Download
जळगाव जिल्ह्यात पोलीस शिपाईची  पदांची भरती; ऑनलाइन अर्ज करा171Download
नागपूर ग्रामीण पोलीस भरती पोलीस शिपाई पदांसाठी भरती होणार, रिक्त पदांचा तपशील272Download
मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयात पोलीस शिपाई पदांची भरती होणार837Download
पोलीस आयुक्त कार्यालय, नवी मुंबई अंतर्गत पोलीस शिपाई पदाकरिता भरती; ऑनलाइन अर्ज करा396Download
मुंबई पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांची भरती; ऑनलाइन अर्ज करा2459Download
पुणे रेल्वे पोलीस अंतर्गत शिपाई पदांची भरती जाहीर54Download
नांदेड पोलीस विभाग अंतर्गत “पोलीस शिपाई” पदांच्या रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा199Download
रत्नागिरी पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई भरती100Download
अहिल्यानगर पोलीस विभागात ‘पोलीस शिपाई’ पदाची भरती जाहिरात प्रकाशित73Download
नागपूर पोलीस विभाग अंतर्गत ‘पोलीस शिपाई’ पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा596Download
अमरावती ग्रामीण पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांच्या रिक्त जागा214Download
पुणे पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांकरिता प्रकाशित1733Download

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा