Pune Mahanagarpalika Bharti 2026 | पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध वैद्यकीय तज्ज्ञ पदांसाठी भरती; 17 सप्टेंबर रोजी थेट मुलाखत

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध वैद्यकीय तज्ज्ञ(Pune Mahanagarpalika Bharti 2026)पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीअंतर्गत स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, निओनेटोलॉजिस्ट (नवजात अर्भक तज्ज्ञ), फिजिशियन, इंटेसिव्हिस्ट, त्वचारोग तज्ज्ञ तसेच क्ष किरण तज्ज्ञ (रेडिओलॉजीस्ट/सोनोलॉजीस्ट) या पदांच्या एकूण 38 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले असून, ही मुलाखत 17 सप्टेंबर 2026 रोजी पुणे येथे होणार आहे.

या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. संबंधित पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदानुसार निश्चित करण्यात आली असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे असून राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

भरतीअंतर्गत स्त्रीरोग तज्ज्ञ पदासाठी 8 जागा, बालरोग तज्ज्ञ पदासाठी 9 जागा, निओनेटोलॉजिस्ट पदासाठी 2 जागा, फिजिशियन पदासाठी 10 जागा, इंटेसिव्हिस्ट पदासाठी 3 जागा, त्वचारोग तज्ज्ञ पदासाठी 1 जागा आणि क्ष किरण तज्ज्ञ (रेडिओलॉजीस्ट/सोनोलॉजीस्ट) पदासाठी 5 जागा उपलब्ध आहेत.

पदाचे नावपदसंख्या
स्त्रीरोग तज्ज्ञ08
बालरोग तज्ज्ञ09
निओनेटोलॉजिस्ट02
फिजिशियन10
इंटेसिव्हिस्ट03
त्वचारोग तज्ज्ञ01
रेडिओलॉजीस्ट / सोनोलॉजीस्ट05
एकूण38

हेही वाचा : Prasar Bharati Recruitment 2026 | प्रसार भारती अंतर्गत मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती; 20 जागा, 21 सप्टेंबरपर्यंत अर्ज

Solapur University Bharti 2026 | सोलापूर विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक पदासाठी भरती; 7 जागा, 17 सप्टेंबरपर्यंत अर्ज, 18 सप्टेंबरला मुलाखत

निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 1 लाख 25 हजार रुपये ते 1 लाख 75 हजार रुपये इतके आकर्षक मानधन देण्यात येणार आहे. सर्व पदांसाठी समान वेतनश्रेणी लागू राहणार आहे. आरोग्य क्षेत्रातील अनुभवी आणि पात्र उमेदवारांसाठी ही उत्तम संधी मानली जात आहे.

मुलाखतीचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज सभागृह (जुना जी. बी. हॉल), पुणे महानगरपालिका मुख्य इमारत, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, शिवाजीनगर, पुणे – 411005 येथे करण्यात आले आहे. उमेदवारांनी मुलाखतीसाठी जाताना आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, ओळखपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या मूळ व छायांकित प्रती सोबत आणणे आवश्यक आहे.

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात काम करण्याची इच्छा असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांसाठी ही मोठी संधी असून, पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. भरतीविषयी अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरील सविस्तर जाहिरात पाहावी.

PDF जाहिरातPune Mahanagarpalika Bharti 2026
अधिकृत वेबसाईटhttps://pmc.gov.in

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा