TCIL Bharti 2025: टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेडने मल्टीटास्क कर्मचारी पदांसाठी नवीन भरती जाहीर केली असून दोन रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. संस्थेने पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले असून अर्ज पूर्णपणे ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ डिसेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे.
या भरतीअंतर्गत मल्टीटास्क कर्मचारी पदासाठी दहा वी उत्तीर्ण उमेदवार पात्र मानले जातील. तसेच उमेदवारांचे वय ५० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेसंबंधी अधिक तपशील मूळ जाहिरातीत उपलब्ध असून अर्ज करण्यापूर्वी ती काळजीपूर्वक वाचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उमेदवारांनी आपले अर्ज tcil@intnet.mu किंवा tcilmur@gmail.com या ई-मेल पत्त्यावर नियोजित वेळेत पाठवावेत. अपूर्ण माहिती असलेले अर्ज नाकारले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि इतर अटींबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट tcil.net.in वर उपलब्ध असलेली PDF जाहिरात पाहावी, असे संस्थेच्यावतीने सांगण्यात आले आहे.
| PDF जाहिरात | https://shorturl.at/Fsm8b |
| अधिकृत वेबसाईट | https://www.tcil.net.in/ |
टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेडने विविध तांत्रिक व सिव्हिल विभागातील पदांसाठी मोठी भरती जाहीर केली असून एकूण 150 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. टीम लीड, मायक्रोवेव्ह/वायरलेस टेक्निशियन, रिगर, आयबीएस डिझायनर/इंजिनिअर, आयबीएस टेक्निशियन, सिव्हिल इंजिनिअर, आयपी इंजिनिअर, ऑप्टिकल फायबर टेक्निशियन आणि सिनियर इंजिनिअर अशा अनेक पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
या पदांसाठी दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा किंवा पदवी अशा विविध शैक्षणिक पात्रता मागविण्यात आल्या आहेत. काही पदांसाठी शैक्षणिक अट नसली तरी सेकंडरी स्कूल उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. वेतनश्रेणीही पदानुसार 2,000 ते 4,000 रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. तसेच उमेदवारांचे वय पदानुसार 40 ते 45 वर्षांच्या मर्यादेत असणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने होणार असून इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज tcilksa@tcil.net.in किंवा tcilksahr@gmail.com या ई-मेल पत्त्यावर पाठवायचे आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 9 डिसेंबर 2025 इतकी आहे. कोणतीही माहिती अपूर्ण आढळल्यास अर्ज नाकारले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पदनिहाय पात्रता, अनुभव, आवश्यक कागदपत्रे आणि सर्व अटींबाबत अधिक तपशील टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या PDF जाहिरातीत दिले असून, इच्छुक उमेदवारांसाठी ही संधी रोजगाराच्या नव्या दालनासारखी उघडी पडली आहे.
| PDF जाहिरात | https://shorturl.at/zWvyJ |
| अधिकृत वेबसाईट | https://www.tcil.net.in/ |
