खुशखबर! विप्रो मध्ये 5000 इंटर्न्सची भरती! आयटी करिअर करण्याची सुवर्णसंधी; त्वरित अर्ज करा | Wipro Summer Internship 2025

Wipro Summer Internship 2025: भारतातील आघाडीची आयटी कंपनी विप्रो लिमिटेडने 2025 साठी ‘WiSE – Wipro Summer Internship Experience’ हा खास समर इंटर्नशिप प्रोग्रॅम सुरू केला आहे. आयटी, बिझनेस स्ट्रॅटेजी आणि कन्सल्टिंगसारख्या क्षेत्रांत करिअर घडवू इच्छिणाऱ्या नवख्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या प्रोग्रॅमअंतर्गत देशभरातून 5000 हून अधिक विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी निवडले जाणार आहे.

विप्रोच्या या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना उद्योगातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव देणे हा आहे. यामुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकातील ज्ञान न राहता, वास्तवातील प्रोजेक्ट्सवर काम करण्याची संधी मिळणार आहे.

कोण करू शकतो अर्ज?
ही इंटर्नशिप मुख्यतः ग्रॅज्युएट किंवा पोस्ट-ग्रॅज्युएट अभ्यासक्रमात शिकणाऱ्या प्री-फायनल व फायनल इयरच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. कोणताही पूर्वानुभव आवश्यक नाही, त्यामुळे नवोदित विद्यार्थ्यांनाही ही संधी खुली आहे.

Wipro Summer Internship 2025

इंटर्नशिप संपूर्ण भारतभर उपलब्ध
WiSE प्रोग्रॅम भारतातील विविध राज्यांतील विप्रोच्या ऑफिसेसमध्ये राबवण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या जवळच्या शहरातही संधी मिळू शकते. यातून विद्यार्थ्यांना कंपनीच्या कार्यपद्धतीचं थेट ज्ञान मिळेल, तसेच प्रोफेशनल नेटवर्कही मजबूत होईल.

WiSE प्रोग्रॅमची वैशिष्ट्यं
या इंटर्नशिपमध्ये विद्यार्थ्यांना खऱ्या बिझनेस समस्यांवर काम करताना प्रोब्लेम-सोल्विंग, टीमवर्क, आणि बिझनेस कम्युनिकेशनसारखी महत्त्वाची कौशल्यं शिकता येतात. विशेष म्हणजे, काही यशस्वी इंटर्न्सना पुढे कंपनीमध्ये नोकरीची संधीही दिली जाऊ शकते.

स्टायपेंड आणि फायदे
इंटर्नशिप दरम्यान निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आकर्षक स्टायपेंड मिळतो. त्याचबरोबर, कंपनीकडून आवश्यक ट्रेनिंग, मेंटॉरिंग आणि प्रत्यक्ष प्रोजेक्ट्सवर काम करण्याचा अनुभव दिला जातो — जो भविष्यातील करिअरसाठी अत्यंत उपयुक्त ठरतो.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रं

  • १०वी, १२वी व पदवीच्या गुणपत्रिका
  • ओळखपत्र (आधार, वोटर आयडी)
  • कॉलेज आयडी कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • कंपनीच्या ई-मेलनुसार इतर कागदपत्रं

अर्ज प्रक्रिया – अगदी सोपी व ऑनलाइन
इच्छुक विद्यार्थ्यांनी Wipro च्या अधिकृत करिअर पोर्टलवर जाऊन आपली प्रोफाईल तयार करावी. त्यानंतर फ्रेश रेस्युमे अपलोड करून इंटर्नशिपसाठी रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

तुमचं उज्वल भविष्य इथूनच सुरू होऊ शकतं!
विप्रोची ही इंटर्नशिप योजना नवोदितांसाठी खास डिझाइन करण्यात आली आहे. जर तुम्हाला आयटी क्षेत्रात करिअर घडवायचं असेल, तर ही एक अमोल संधी तुमच्यासमोर आहे. आजच अर्ज करा, कारण संधी मर्यादित कालावधीसाठीच उपलब्ध आहे!