HCL मध्ये इंटर्नशिपची संधी: ५,००० पेक्षा जास्त जागा उपलब्ध, त्वरित अर्ज करा | HCL Internship 2025

HCL Internship 2025: एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एचसीएल व्हर्च्युअल इंटर्नशिप २०२५’ हा उपक्रम जाहीर करण्यात आला असून, हा प्रोग्राम भारतातील नवउदीत पदवीधरांना करिअरमध्ये एक उत्तम सुरुवात करण्याची संधी देतो. यामध्ये ५,००० पेक्षा जास्त जागा उपलब्ध असून, विविध शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही इंटर्नशिप खुली आहे.

या इंटर्नशिपद्वारे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करण्याचा, शिकण्याचा आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्याचा अनमोल अनुभव मिळणार आहे. एचसीएलच्या मार्गदर्शनाखाली हे विद्यार्थी प्रत्यक्ष प्रकल्पांवर काम करणार असून, आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यावसायिक वातावरणात स्वतःची ओळख निर्माण करू शकणार आहेत.

इंटर्नशिपचे मुख्य वैशिष्ट्येHCL Internship 2025

  • अनुभवी व्यावसायिकांच्या मार्गदर्शनाखाली लाईव्ह प्रोजेक्ट्सवर काम
  • उद्योगातील खऱ्या समस्यांवर टीमसोबत काम करत उपाय शोधणे
  • व्यवसाय धोरणे तयार करण्यात आणि सुधारण्यात सहभाग
  • ऑनलाइन प्रशिक्षण घेऊन NSDC कडून अधिकृत प्रमाणपत्र मिळविण्याची संधी
  • डेटाचा अभ्यास, संशोधन व अहवाल तयार करण्याचे काम
  • डिजिटल मीटिंग्स व ब्रेनस्टॉर्मिंग सेशन्समध्ये सहभाग
  • तांत्रिक कौशल्य वाढविण्यासाठी विविध सॉफ्टवेअर्स व टूल्स वापरण्याचा अनुभव
  • इतर प्रोफेशनल्सशी नेटवर्किंग करण्याची संधी

या इंटर्नशिपसाठी पात्रता काय आहे?
या इंटर्नशिपसाठी UG आणि PG पदवीधर अर्ज करू शकतात. अनुभव नसलेले किंवा ० ते १ वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार यासाठी पात्र आहेत. ही पूर्णवेळ (Full Time) आणि वर्क फ्रॉम ऑफिस (WFO) स्वरूपातील संधी आहे. पगाराची माहिती अद्याप उघड करण्यात आलेली नाही.

एचसीएल टेक्नॉलॉजीसारख्या आघाडीच्या कंपनीसोबत काम करण्याची ही संधी विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणपुरते मर्यादित न ठेवता, व्यावसायिक जगात स्वतःला सिद्ध करण्याचा मंच देते.

नोंदणी कशी कराल?
एचसीएल व्हर्च्युअल इंटर्नशिप २०२५ साठी अर्ज करायचा असल्यास, इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी. संधी मर्यादित आहेत, त्यामुळे लवकर अर्ज करा आणि तुमच्या करिअरला यशस्वी सुरुवात द्या.

अर्ज करण्याची लिंक