MPSC Bharti 2025: महाराष्ट्रातील शासकीय नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) मार्फत पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा (गट-अ) या पदांसाठी तब्बल २७९५ रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. ही भरती पशुसंवर्धन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे.
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया २९ एप्रिल २०२५ पासून सुरू झाली असून १९ मे २०२५ ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करता येणार आहेत, त्यामुळे इच्छुकांनी वेळ वाया न घालवता अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज सादर करावा.
या पदासाठी उमेदवाराकडे पशुवैद्यकशास्त्र किंवा पशुवैद्यकशास्त्र व पशुपालन विषयातील पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे, तसेच आरक्षित प्रवर्गासाठी शिथिलता लागू आहे.
शासकीय सेवेत गट-अ मध्ये समावेश असलेल्या या पदासाठी मिळणारे वेतनही आकर्षक असून रु. ५६,१०० ते १,७७,५०० दरम्यान आहे. अर्ज करताना संबंधित शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक असून, कोणतीही माहिती अपूर्ण असल्यास अर्ज थेट अपात्र ठरविण्यात येईल.
खुल्या वर्गासाठी अर्ज शुल्क रु. ३९४/- तर मागासवर्गीय, EWS, अनाथ आणि अपंग उमेदवारांसाठी रु. २९४/- इतके आहे.
या परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षापद्धतीसंबंधी सविस्तर माहिती आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर (https://mpsc.gov.in) तसेच जाहीर केलेल्या PDF जाहिरातीत उपलब्ध आहे.
MPSC Bharti 2025
| PDF जाहिरात | https://shorturl.at/MLZxL |
| ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/xUqqj |
| अधिकृत वेबसाईट | https://mpsc.gov.in/ |
