Bank of Baroda Bharti 2025: बँक ऑफ बडोदा अंतर्गत 82 पदांसाठी भरती, त्वरित अर्ज करा

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

Bank of Baroda Bharti 2025: बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत विविध विभागांमध्ये मोठी भरती जाहीर झाली आहे. झोनल रिसीव्हेबल्स मॅनेजर, रिजनल रिसीव्हेबल्स मॅनेजर, एरिया रिसीव्हेबल्स मॅनेजर, कम्प्लायन्स मॅनेजर, कम्प्लेन्स मॅनेजर, प्रोसेस मॅनेजर, व्हेंडर मॅनेजर आणि फ्लोअर मॅनेजर अशा एकूण 82 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी 9 डिसेंबर 2025 ही अंतिम तारीख लक्षात ठेवावी.

या सर्व पदांसाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा 25 ते 52 वर्षे ठेवण्यात आली आहे. अर्ज करताना सामान्य, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी श्रेणीसाठी 850 रुपये तर अनुसूचित जाती, जमाती, अपंग तसेच महिला उमेदवारांसाठी 175 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator 

Bank of Baroda Bharti 2025

पदाचे नावपदसंख्या
झोनल रिसीव्हेबल्स मॅनेजर13
रिजनल रिसीव्हेबल्स मॅनेजर / एरिया रिसीव्हेबल्स मॅनेजर13
कम्प्लायन्स मॅनेजर49
कम्प्लेन्स मॅनेजर01
प्रोसेस मॅनेजर01
व्हेंडर मॅनेजर01
फ्लोअर मॅनेजर03
PDF जाहिरातhttps://shorturl.at/brC95
ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/2r8x0
अधिकृत वेबसाईटhttps://www.bankofbaroda.in/

, बँकेने स्वतंत्रपणे “एमडी आणि सीईओ” या उच्चस्तरीय पदासाठीही एक जागा जाहीर केली आहे. या पदासाठी अभियांत्रिकी पदवी, एमसीए किंवा विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. या भरतीसाठी उमेदवारांचे कमाल वय 55 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2025 आहे.

एमडी आणि सीईओ – पदाचा तपशील

पदाचे नावपदसंख्यापात्रता
एमडी आणि सीईओ01Engineering Graduate / MCA / PG in Science
PDF जाहिरातhttps://shorturl.at/o0KJB
ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/SXt7U
अधिकृत वेबसाईटhttps://www.bankofbaroda.in/

दोन्ही भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचे असून, उमेदवारांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे संपूर्ण माहिती भरावी. अपूर्ण अर्ज सरळ अपात्र ठरवले जातील. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी बँक ऑफ बडोदा यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.


ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा