महाराष्ट्र पोलीस भरती 2025 : राज्यात 15,631 पदांसाठी मोठी घोषणा, संधी चुकवू नका, त्वरित अर्ज करा | Maharashtra Police Bharti 2025

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

Maharashtra Police Bharti 2025: राज्यातील तरुणांनी मोठ्या उत्सुकतेने वाट पाहिलेली महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया अखेर जाहीर झाली आहे. यंदाच्या भरतीत एकूण 15,631 पदे भरली जाणार असून पोलीस शिपाई, पोलीस शिपाई बॅण्ड्समन, SRPF तसेच रेल्वे पोलीस अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 आहे.

शैक्षणिक पात्रता

भरतीतील सर्वात मोठा गट असलेले पोलीस शिपाई पदासाठी किमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
पोलीस शिपाई चालक पदासाठी (Driver) उमेदवारांकडे वैध LMV-TR वाहन चालविण्याचा परवाना असणे सक्तीचे आहे.

आवश्यक कागदपत्रांची यादी

अर्जासोबत उमेदवारांना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:

  • आधार कार्ड
  • निवास प्रमाणपत्र
  • 10वी / 12वी मार्कशीट
  • पदवी प्रमाणपत्र (लागल्यास)
  • संगणक प्रवीणता प्रमाणपत्र (MS-CIT किंवा तत्सम मान्यताप्राप्त परीक्षा)
  • चारित्र्य प्रमाणपत्र
  • स्वाक्षरी (स्कॅन कॉपी)
  • फोटो (50 KB च्या आत)
  • जात प्रमाणपत्र / जातवैधता (लागल्यास)
  • नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र
  • ओळखपत्र (PAN, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र इ.)

वयाची अट (Age Limit)

प्रवर्गवयोमर्यादा
खुला18 ते 28 वर्षे
मागास18 ते 33 वर्षे
प्रकल्पग्रस्त18 ते 45 वर्षे
माजी सैनिकसेवाकाळ + 3 वर्षे सूट
अनाथ18 ते 33 वर्षे
भूकंपग्रस्त18 ते 45 वर्षे
खेळाडू18 ते 38 वर्षे
पोलीस पाल्य18 ते 33 वर्षे
महिला आरक्षण18 ते 33 वर्षे

शारीरिक पात्रता (Physical Eligibility)

उंची

उमेदवारकिमान उंची
पुरुष165 सेमी
महिला158 सेमी (काही विभागांमध्ये 155 सेमीही स्वीकार्य)*

छाती (फक्त पुरुष उमेदवारांसाठी)

  • न फुगवता किमान 79 सेमी

लेखी परीक्षा – पॅटर्न आणि गुण

उमेदवारांना सर्वप्रथम 100 गुणांची लेखी परीक्षा द्यावी लागेल. परीक्षा मराठी भाषेत होईल आणि 90 मिनिटांचा वेळ असेल.

विषयगुण
अंकगणित20
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी20
बुद्धिमत्ता चाचणी20
मराठी व्याकरण20
मोटार वाहन चालविणे / वाहतूक नियम20
एकूण100 गुण

शारीरिक चाचणी (फक्त लेखी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांसाठी)

नवीन नियमांनुसार फक्त लेखी परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांनाच शारीरिक चाचणी देता येईल.

शारीरिक चाचणी — 50 गुण
वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी (Driver Post) — 50 गुण

पुरुष उमेदवारांसाठी

प्रकारगुण
1600 मी. धावणे30
100 मी. धावणे10
गोळाफेक10
एकूण50 गुण

महिला उमेदवारांसाठी

प्रकारगुण
800 मी. धावणे30
100 मी. धावणे10
गोळाफेक (4 किलो)10
एकूण50 गुण

अर्ज फी

प्रवर्गफी
खुला₹450
आरक्षण प्रवर्ग₹350
माजी सैनिकसूट

निवड प्रक्रिया (Selection Process)

  1. लेखी परीक्षा
  2. शारीरिक चाचणी
  3. दस्तऐवज पडताळणी
  4. अंतिम निवड यादी
DistrictNo Of vacancyPDF
जालना पोलीस विभाग अंतर्गत “पोलीस शिपाई” भरती156Download
सोलापूर ग्रामीण पोलीस “पोलीस शिपाई” पदाकरिता ऑनलाईन अर्ज करा90Download
सोलापूर पोलीस विभाग अंतर्गत रिक्त पदांची भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती79Download
पालघर पोलीस भरती अंतर्गत ‘पोलीस शिपाई’ पदाची जाहिरात प्रकाशित202Download
बीड पोलीस दलात कॉन्स्टेबलच्या जागा रिक्त; जाणून घ्या सविस्तर माहिती174Download
पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी अंतर्गत ‘पोलीस शिपाई चालक’ पदांकरिता भरती08Download
जळगाव जिल्ह्यात पोलीस शिपाईची  पदांची भरती; ऑनलाइन अर्ज करा171Download
नागपूर ग्रामीण पोलीस भरती पोलीस शिपाई पदांसाठी भरती होणार, रिक्त पदांचा तपशील272Download
मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयात पोलीस शिपाई पदांची भरती होणार837Download
पोलीस आयुक्त कार्यालय, नवी मुंबई अंतर्गत पोलीस शिपाई पदाकरिता भरती; ऑनलाइन अर्ज करा396Download
मुंबई पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांची भरती; ऑनलाइन अर्ज करा2459Download
पुणे रेल्वे पोलीस अंतर्गत शिपाई पदांची भरती जाहीर54Download
नांदेड पोलीस विभाग अंतर्गत “पोलीस शिपाई” पदांच्या रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा199Download
रत्नागिरी पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई भरती100Download
अहिल्यानगर पोलीस विभागात ‘पोलीस शिपाई’ पदाची भरती जाहिरात प्रकाशित73Download
नागपूर पोलीस विभाग अंतर्गत ‘पोलीस शिपाई’ पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा596Download
अमरावती ग्रामीण पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांच्या रिक्त जागा214Download
पुणे पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांकरिता प्रकाशित1733Download

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा