महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अंतर्गत 300 पदांकरिता भरती सुरु; त्वरित अर्ज करा| Mahavitaran Bharti 2025

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

Mahavitaran Bharti 2025: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) अंतर्गत विविध तांत्रिक आणि प्रशासकीय पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक आणि उपव्यवस्थापक या पदांसाठी एकूण 300 रिक्त जागा उपलब्ध असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2025 अशी आहे.

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator 

ही भरती मुख्यत्वे इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल अभियांत्रिकी पदवीधारकांसाठी तसेच वित्त आणि लेखा क्षेत्रातील पात्र उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. पदानुसार शैक्षणिक पात्रता भिन्न असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वयोमर्यादा साधारण 35 ते 40 वर्षे ठेवण्यात आली आहे.

अर्ज शुल्कामध्ये ओपन प्रवर्गासाठी 500 रुपये, तर आरक्षित व EWS उमेदवारांसाठी 250 रुपये इतके शुल्क आकारले जाणार आहे. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडत असून इच्छुक उमेदवारांनी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करावा.

पदनिहाय रिक्त जागा – Mahavitaran Bharti 2025

Post NameNo. of Posts
Additional Executive Engineer (Dist.)94
Additional Executive Engineer (Civil)5
Deputy Executive Engineer (Dist.)69
Deputy Executive Engineer (Civil)12
Senior Manager13
Manager25
Deputy Manager82
Total300

शैक्षणिक पात्रता

Post NameQualification
Additional Executive Engineer (Dist.)Degree / BE / B.Tech in Electrical
Additional Executive Engineer (Civil)Degree / BE / B.Tech in Civil
Deputy Executive Engineer (Dist.)Degree / BE / B.Tech in Electrical
Deputy Executive Engineer (Civil)Degree / BE / B.Tech in Civil
Senior ManagerCA, CMA
ManagerCA, CMA, M.Com
Deputy ManagerCA, CMA, B.Com, M.Com, MBA

पदनिहाय वेतन

Post NameSalary (Per Month)
Additional Executive Engineer (Dist./Civil)Rs. 81,850 – 1,84,475
Deputy Executive Engineer (Dist./Civil)Rs. 73,580 – 1,66,555
Senior ManagerRs. 97,220 – 2,09,445
ManagerRs. 75,890 – 1,68,865
Deputy ManagerRs. 54,505 – 1,37,995

अर्ज कसा करावा?

उमेदवारांना अर्ज पूर्णतः ऑनलाइन सादर करावा लागणार आहे. ऑनलाइन फॉर्म भरण्यापूर्वी अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या सूचनांचे वाचन करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्याच्या सर्व मार्गदर्शक सूचना संकेतस्थळावर दिलेल्या आहेत. इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज 22 डिसेंबर 2025 पर्यंत सादर करावा. अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात (PDF) तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

PDF जाहिरात-1https://shorturl.at/XNbbR
PDF जाहिरात-2https://shorturl.at/QCyPP
ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/wIxkq
अधिकृत वेबसाईटhttps://www.mahadiscom.in/

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा