Bank of Badoda Bharti 2026 | बँक ऑफ बडोदामध्ये ३५८२ पदांची भरती; विविध पदांसाठी ऑनलाइन अर्जाची संधी

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी बँक ऑफ बडोदाकडून(Bank of Badoda Bharti 2026)मोठी संधी उपलब्ध झाली आहे. बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून, दिलेल्या माहितीनुसार एकूण ३५८२ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीमध्ये वेल्थ एक्झिक्युटिव्ह, क्रेडिट ॲनालिस्ट – C&IC आणि स्थानिक बँक अधिकारी अर्थात LBO या पदांचा समावेश आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

या भरतीमध्ये वेल्थ एक्झिक्युटिव्ह आणि क्रेडिट ॲनालिस्ट – C&IC या पदांसाठी एकूण ११०० जागा आहेत. यामध्ये वेल्थ एक्झिक्युटिव्हच्या १०००, तर क्रेडिट ॲनालिस्ट – C&IC पदाच्या १०० जागांचा समावेश आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ सप्टेंबर २०२६ आहे. या पदांसाठी वयोमर्यादा २१ ते ३३ वर्षे देण्यात आली आहे.

तसेच बँक ऑफ बडोदा अंतर्गत स्थानिक बँक अधिकारी (LBO) पदासाठी तब्बल २४८२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ सप्टेंबर २०२६ आहे. LBO पदासाठी उमेदवारांचे वय २१ ते ३० वर्षे असावे. दोन्ही भरतींसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी संबंधित पदासाठीची पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

बँक ऑफ बडोदा भरतीतील पदांची माहिती : Bank of Badoda Bharti 2026

पदाचे नावपदसंख्यावयोमर्यादाअर्जाची अंतिम तारीख
Wealth Executive100021 ते 33 वर्षे24 सप्टेंबर 2026
Credit Analyst – C&IC10021 ते 33 वर्षे24 सप्टेंबर 2026
Local Bank Officer (LBO)248221 ते 30 वर्षे7 सप्टेंबर 2026
एकूण3582

वेल्थ एक्झिक्युटिव्ह पदासाठी JMG/S-I स्केलनुसार वेतनश्रेणी ४८,४८० रुपयांपासून ८५,९२० रुपयांपर्यंत आहे. तर Credit Analyst – C&IC पदासाठी MMG/S-II स्केलमध्ये वेतनश्रेणी ६४,८२० रुपयांपासून ९३,९६० रुपयांपर्यंत देण्यात आली आहे.

या भरतीसाठी अर्ज शुल्काची माहितीही देण्यात आली आहे. General, EWS आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी ८५० रुपये शुल्क असून त्यामध्ये GST आणि Payment Gateway charges लागू आहेत. तर SC, ST, PWD, ESM/DESM आणि महिला उमेदवारांसाठी १७५ रुपये शुल्क असून हे केवळ intimation charges आहेत. याशिवाय Payment Gateway charges लागू होऊ शकतात.

प्रवर्गअर्ज शुल्क
General / EWS / OBC₹850 + Payment Gateway charges
SC / ST / PWD / ESM/DESM / Women₹175 + Payment Gateway charges

हेही वाचा : ग्रामीण बँकांमध्ये १३,७०६ पदांची मोठी भरती; पदवीधारकांना संधी, त्वरित अर्ज करा | IBPS RRB Bharti 2026

Jilhadhikari Karyalay Solapur Bharti 2026 | जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर अंतर्गत 592 रिक्त पदांची भरती; 30 सप्टेंबरपर्यंत अर्जाची संधी

ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया

बँक ऑफ बडोदा भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवारांनी संबंधित भरतीसाठी दिलेल्या ऑनलाइन अर्जाच्या लिंकवरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. अर्ज भरताना आवश्यक असलेली सर्व माहिती अचूकपणे भरणे महत्त्वाचे आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण राहिल्यास किंवा आवश्यक माहिती सादर न केल्यास अर्ज अपात्र ठरविला जाऊ शकतो.

विशेष म्हणजे या भरतीच्या दोन भागांसाठी अंतिम तारखा वेगवेगळ्या आहेत. Local Bank Officer पदासाठी ७ सप्टेंबर २०२६ ही अर्जाची अंतिम तारीख आहे, तर Wealth Executive आणि Credit Analyst – C&IC पदांसाठी २४ सप्टेंबर २०२६ ही अंतिम तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे, त्यानुसार अंतिम तारीख लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

भरतीसंदर्भातील शैक्षणिक पात्रता, पदनिहाय अटी, अर्ज प्रक्रिया आणि इतर आवश्यक माहितीसाठी उमेदवारांनी बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत संकेतस्थळावरील मूळ PDF जाहिरात वाचावी. अर्ज करण्यापूर्वी सर्व पात्रता अटी तपासूनच ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

PDF जाहिरात BANK OF BARODA BHARTI 2026
ऑनलाईन अर्ज करा https://lnk.ua/DDLAkk4nm
अधिकृत वेबसाईटhttps://www.bankofbaroda.in/
PDF जाहिरात BANK OF BARODA BHARTI 2026
ऑनलाईन अर्ज करा https://lnk.ua/gVQZBOpPZ
अधिकृत वेबसाईटhttps://www.bankofbaroda.in/


ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा