Kotwal Bharti 2026: राज्यातील महसूल विभागात रिक्त असलेल्या महसूल सेवक अर्थात कोतवाल पदांच्या भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने राज्यभरातील रिक्त कोतवाल पदे भरण्यास विशेष बाब म्हणून मान्यता दिली असून, ही भरती प्रक्रिया तातडीने राबविण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. शासनाने स्पष्टपणे सांगितले आहे की, कोणत्याही परिस्थितीत ही भरती प्रक्रिया 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी पूर्ण करण्यात यावी.
Quick Information / थोडक्यात माहिती – Kotwal Bharti 2026
माहिती
तपशील
विभाग
महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन
पदाचे नाव
महसूल सेवक (कोतवाल)
एकूण रिक्त पदे
2,912
एकूण मंजूर पदे
12,978
एकूण भरलेली पदे
10,066
रिक्त पदांची आधार तारीख
31 मे 2026
भरतीचा प्रकार
विशेष बाब
अर्ज / भरती प्रक्रिया
संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत
निवड समिती
जिल्हाधिकारी / नामनिर्देशित अधिकारी
पत्राची तारीख
19 ऑगस्ट 2026
भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख
30 नोव्हेंबर 2026
महसूल सेवक (कोतवाल) भरतीबाबत महत्त्वाची माहिती
महसूल व वन विभागाने महसूल सेवक (कोतवाल) पदांच्या रिक्त जागांबाबत महत्त्वाचे पत्र जारी केले आहे. या पत्रानुसार 31 मे 2026 या आधार तारखेच्या स्थितीनुसार राज्यात महसूल सेवक पदांची 2,912 पदे रिक्त आहेत.
भरती प्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी अथवा त्यांनी नामनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमार्फत राबविण्यात येणार आहे.
संबंधित शासन निर्णयातील सुधारित तरतुदींचे पालन करून जिल्हानिहाय उपलब्ध रिक्त पदांनुसार भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्हानिहाय रिक्त पदे
अ.क्र.
जिल्हा
मंजूर पदे
भरलेली पदे
रिक्त पदे
1
छत्रपती संभाजीनगर
500
217
283
2
जालना
291
244
47
3
परभणी
313
249
64
4
हिंगोली
174
129
45
5
नांदेड
457
379
78
6
बीड
371
300
71
7
लातूर
317
255
62
8
धाराशिव
251
216
35
9
नागपूर
425
310
115
10
वर्धा
277
231
46
11
गोंदिया
197
139
58
12
गडचिरोली
196
157
39
13
चंद्रपूर
287
211
76
14
भंडारा
699
629
70
15
अमरावती
543
459
84
16
अकोला
310
230
80
17
वाशिम
280
239
41
18
बुलढाणा
528
443
85
19
यवतमाळ
628
520
108
20
पुणे
588
439
149
21
सातारा
546
455
91
22
सांगली
354
287
67
23
सोलापूर
535
421
114
24
कोल्हापूर
469
362
107
25
नाशिक
532
383
149
26
धुळे
225
178
47
27
नंदुरबार
222
177
45
28
जळगाव
495
409
86
29
अहिल्यानगर
583
482
101
30
मुंबई शहर
0
0
0
31
मुंबई उपनगर
41
28
13
32
ठाणे
185
77
108
33
पालघर
178
55
123
34
रायगड
351
232
119
35
रत्नागिरी
394
330
64
36
सिंधुदुर्ग
236
194
42
एकूण
12,978
10,066
2,912
विभागनिहाय रिक्त पदे
विभाग
मंजूर पदे
भरलेली पदे
रिक्त पदे
छत्रपती संभाजीनगर विभाग
2,674
1,989
685
नागपूर विभाग
2,081
1,677
404
अमरावती विभाग
2,289
1,891
398
पुणे विभाग
2,492
1,964
528
नाशिक विभाग
2,057
1,629
428
कोकण विभाग
1,385
916
469
एकूण
12,978
10,066
2,912
एकूण रिक्त पदांची आकडेवारी
तपशील
संख्या
एकूण मंजूर पदे
12,978
एकूण भरलेली पदे
10,066
एकूण रिक्त पदे
2,912
कोतवाल परीक्षा 2026 कार्यक्रम / Recruitment Schedule
शासनाच्या जोडलेल्या कार्यक्रमानुसार भरती प्रक्रियेचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत.
कार्यक्रम / Event
तारीख / Date
तालुकानिहाय रिक्त जागांची यादी बनवणे
02.09.2026 ते 08.09.2026
रिक्त जागेनुसार बिंदू नामावली तयार करणे
09.09.2026 ते 15.09.2026
परीक्षा भरतीकरिता समिती स्थापना
16.09.2026
जाहिरातीचा दिनांक
02.10.2026 ते 17.10.2026
अर्जांची छाननी
18.10.2026 ते 01.11.2026
प्रवेशपत्र उपलब्ध
04.11.2026 ते 10.11.2026
परीक्षा दिनांक
11.11.2026
उत्तरसूची आणि निकाल घोषणा
12.11.2026
दस्तऐवज पडताळणी
13.11.2026 ते 27.11.2026
नियुक्तीपत्र
28.11.2026
महत्त्वाच्या तारखा
कार्यक्रम
तारीख
रिक्त पदांची आधार तारीख
31 मे 2026
पत्राची तारीख
19 ऑगस्ट 2026
भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख
30 नोव्हेंबर 2026
महत्त्वाच्या सूचना
जिल्हाधिकारी अथवा त्यांनी नामनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमार्फत प्रक्रिया राबविण्यात येईल.
संबंधित शासन निर्णयातील सुधारित तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे.
भरती प्रक्रिया 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्हानिहाय उपलब्ध रिक्त पदांच्या विवरणानुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.
पात्रता, वयोमर्यादा आणि इतर अटींसाठी संबंधित शासन निर्णय व अधिकृत जाहिरात तपासावी.
अर्ज प्रक्रिया, निवड पद्धत आणि इतर अंतिम तपशील संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत सूचनेनुसार तपासावेत.
महसूल सेवक किंवा कोतवाल हे गावपातळीवरील महसूल प्रशासनातील महत्त्वाचे पद मानले जाते. महसूल विभागाच्या विविध कामांमध्ये मदत करणे, शासकीय सूचना नागरिकांपर्यंत पोहोचवणे, पंचनामे आणि प्रशासकीय कामकाजात सहकार्य करणे अशा जबाबदाऱ्या कोतवालांकडे असतात. त्यामुळे ही भरती ग्रामीण भागातील रोजगाराच्या दृष्टीनेही महत्त्वाची मानली जात आहे.
उमेदवारांनी सध्या संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांच्या अधिकृत संकेतस्थळांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. भरतीची जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, निवड पद्धत आणि इतर अटी जिल्हानिहाय स्वतंत्रपणे जाहीर केल्या जाणार आहेत. शासनाच्या तातडीच्या निर्देशांमुळे येत्या काही दिवसांत विविध जिल्ह्यांमधून भरती जाहिराती प्रसिद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कोतवाल भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी ठरणार आहे.