चंद्रपूर | जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर येथे सफाईगार पदासाठी भरतीची (Chandrapur District Court Bharti 2025) प्रक्रिया सुरू झाली आहे. न्यायालय प्रशासनाने एकूण ५ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. ही भरती पूर्णतः ऑफलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी पोस्टाने किंवा प्रत्यक्ष जाऊन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
भरतीविषयक माहिती: Chandrapur District Court Bharti 2025
सफाईगार पदासाठी इच्छुक उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेसंदर्भात मूळ जाहिरात वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पदासाठी निश्चित करण्यात आलेली वेतनश्रेणी S-1 (₹15,000 ते ₹47,600) इतकी आहे.
रिक्त पदांचा तपशील:
| पदाचे नाव | पदसंख्या | वेतनश्रेणी |
|---|---|---|
| सफाईगार | 05 | ₹15,000 – ₹47,600 (S-1) |
अर्ज प्रक्रिया: Chandrapur District Court Recruitment 2025
उमेदवारांनी अर्ज खालील पत्त्यावर १० जून २०२५ पर्यंत पाठवावा:
पत्ता:
प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, (न्यायमंदिर), बस स्टँड समोर, चंद्रपूर – ४४२४०१.
अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे संलग्न करावीत. अपूर्ण अर्ज किंवा मुदतीनंतर आलेले अर्ज सरसकट रद्द करण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची सविस्तर सूचना आणि मूळ जाहिरात https://chandrapur.dcourts.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
ही संधी स्थानिक पातळीवरील उमेदवारांसाठी महत्त्वाची आहे, विशेषतः ज्यांना शासकीय नोकरीत प्रवेश घ्यायचा आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावा.
| PDF जाहिरात | https://shorturl.at/GuUbP |
| अधिकृत वेबसाईट | https://chandrapur.dcourts.gov.in/ |
