IDBI Bank Bharti 2025: IDBI बँकेत नोकरीची संधी शोधत असलेल्या तरुणांसाठी एक महत्त्वाची भरती जाहीर झाली आहे. ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर (JAM) या पदासाठी एकूण 676 जागा उपलब्ध असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती 20 ते 25 वयोगटातील उमेदवारांसाठी खुली असून, उमेदवारांनी 20 मे 2025 ही अंतिम तारीख लक्षात ठेवावी.
या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे किमान पदवी असणे आवश्यक आहे. सामान्य, EWS आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 60% गुण, तर SC, ST व PwBD उमेदवारांसाठी किमान 55% गुण आवश्यक आहेत. केवळ डिप्लोमा कोर्स केलेले उमेदवार पात्र समजले जाणार नाहीत.
SC, ST व PwBD प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹250 आहे (फक्त सूचना शुल्क), तर इतर सर्व उमेदवारांसाठी ₹1050 इतके शुल्क आकारले जाणार आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून, अर्ज करताना सर्व माहिती अचूक व संपूर्ण भरली पाहिजे. कोणतीही माहिती अपूर्ण असल्यास अर्ज फेटाळण्यात येऊ शकतो. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडणे अनिवार्य आहे.
अधिकृत माहिती आणि अर्ज करण्यासाठी IDBI बँकेच्या https://www.idbibank.in/ या वेबसाईटला भेट द्यावी. तसेच, अधिक तपशील व अटींसाठी मूळ PDF जाहिरात वाचणे आवश्यक आहे.
तुमचे वय भरतीच्या निकषांनुसार येते का ते तपासण्यासाठी, वय मोजण्यासाठीचा ऑनलाइन Age Calculator वापरणे सोयीचे ठरेल.
Advertisement | READ PDF |
Online Application Link | Apply Online |
Official Website | Official Website |