कोल्हापूर | येथे स्थानिक बेरोजगार उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. २५ मे २०२५ रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा – 1 चे आयोजन (Kolhapur Job Fair 2025) करण्यात आले असून, या मेळाव्यात खाजगी नियोक्त्यांकडून विविध पदांकरिता भरती केली जाणार आहे.
ही भरती कोल्हापूर जिल्ह्यातील इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी असून, संबंधित उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने मेळाव्याच्या दिवशी थेट उपस्थित राहायचे आहे. मेळाव्याचे आयोजन शिरोली एमआयडीसीमधील शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (स्मॅक), पी-५९, कोल्हापूर येथे करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यात विविध पदांकरिता भरती होणार असून, नेमकी पदे व त्यांचे तपशील दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहेत. शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि इतर आवश्यक माहिती उमेदवारांनी लिंकवरून पूर्णपणे वाचून घ्यावी.
ही संधी केवळ कोल्हापूरच नव्हे तर पुणे विभागातील उमेदवारांसाठी उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांनी या रोजगार मेळाव्याला जरूर उपस्थित राहावे व आपले करिअर घडवण्याची संधी साधावी.
तपशील व लिंकसाठी अधिकृत संकेतस्थळ किंवा रोजगार कार्यालयाशी संपर्क साधावा.
जाहिरात | https://shorturl.at/dpDER |
नोंदणी करा | https://shorturl.at/tRWX2 |