Renukamata Multistate Society Bharti 2025: श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसायटी लि., अहमदनगर अंतर्गत विविध शाखांमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 200 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.
यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच ई-मेल किंवा व्हॉट्सअॅपद्वारे पाठवायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2025 आहे. त्यामुळे उमेदवारांनी वेळ न दवडता त्वरित अर्ज करणे गरजेचे आहे.
Renukamata Multistate Society Bharti 2025
या भरतीअंतर्गत शाखा व्यवस्थापक, सहाय्यक शाखा व्यवस्थापक, पासिंग ऑफिसर, कॅशिअर, क्लार्क आणि मार्केटिंग क्लार्क अशा विविध पदांची भरती केली जाणार आहे. प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून, वरिष्ठ पदांसाठी पदव्युत्तर शिक्षण आवश्यक आहे तर मार्केटिंग क्लार्कसाठी केवळ १२ वी उत्तीर्ण असणे पुरेसे आहे.
शाखा व्यवस्थापक, सहाय्यक शाखा व्यवस्थापक आणि पासिंग ऑफिसरसाठी एम.कॉम, एम.ए., एम.एस्सी किंवा एम.बी.ए. (फायनान्स) ही पदव्युत्तर पात्रता आवश्यक आहे. तर कॅशिअर आणि क्लार्कसाठी बी.कॉम, बी.ए. किंवा बी.एस्सी पदवी आवश्यक आहे. मार्केटिंग क्लार्कसाठी १२ वी पास उमेदवार अर्ज करू शकतात.
या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह आपला अर्ज खालील ई-मेल पत्त्यावर किंवा व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावा:
ई-मेल: callcentre@renukamatamultistate.com, recruitment@renukamatamultistate.com
व्हॉट्सअॅप क्रमांक: 9225320280
अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण असल्यास किंवा आवश्यक कागदपत्रे जोडलेली नसल्यास अर्ज अमान्य ठरवला जाऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे अत्यंत आवश्यक आहे.
अधिकृत वेबसाईटवर जाऊन (www.renukamatamultistate.com) तुम्ही भरतीसंदर्भातील अधिक माहिती व जाहिरात डाउनलोड करू शकता.
PDF जाहिरात | https://shorturl.at/svUG5 |
अधिकृत वेबसाईट | http://www.renukamatamultistate.com/ |