राष्ट्रीय आरोग्य अभियान कोल्हापूर येथे विविध रिक्त पदांची भरती; अर्ज करण्याची शेवटची संधी | NHM Kolhapur Bharti 2025

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

NHM Kolhapur Bharti 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ नर्स पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण १४ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १४ मे २०२५ आहे.

भरतीची प्रक्रिया वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ नर्स या दोन प्रमुख पदांसाठी राबवली जात आहे. वैद्यकीय अधिकारी पदासाठी थेट मुलाखती घेतल्या जाणार असून त्या दर सोमवारी आयोजित केल्या जातील. तर स्टाफ नर्स पदासाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.

पदांची माहिती पुढीलप्रमाणे: NHM Kolhapur Bharti 2025

पदाचे नावपदसंख्याशैक्षणिक पात्रतावेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी02MBBS₹60,000/-
स्टाफ नर्स12GNM / B.Sc Nursing आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी अथवा नूतनीकरण प्रमाणपत्र अनिवार्य₹20,000/-

या पदांसाठी नोकरीचे ठिकाण कोल्हापूर हेच आहे. वैद्यकीय अधिकारी पदासाठी इच्छुक उमेदवारांनी कोल्हापूर महानगरपालिका मुख्य इमारत येथे दर सोमवारी होणाऱ्या मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. त्यासाठी कोणतीही वेगळी अर्ज प्रक्रिया नाही.

स्टाफ नर्स पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मा. आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका, भाऊसिंगजी रोड, कोल्हापूर या पत्त्यावर आपला अर्ज पोस्टाने अथवा प्रत्यक्ष पोहोचवावा. अर्ज करताना संपूर्ण माहिती आणि आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ मे २०२५ आहे.

भरतीसंदर्भातील अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ https://www.zpkolhapur.info किंवा जाहिरातीत दिलेली PDF पाहावी.

PDF जाहिरातhttps://shorturl.at/uWX5G
अधिकृत वेबसाईटhttps://www.zpkolhapur.info/

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा