Mahavitaran Nagpur Bharti 2025: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नागपूर विभागामार्फत “शिकाऊ उमेदवार” पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 मे 2025 आहे. ही भरती विजतंत्री, माहिती तंत्रज्ञान, तारतंत्री आणि कोपा या विभागांतर्गत एकूण 187 जागांसाठी होत आहे.
उमेदवारांनी लक्षात घ्यावं की, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून नोंदणी प्रक्रियेनंतर अर्जाची प्रत संबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
नागपूर महावितरण भरती 2025 – पदांचा तपशील: Mahavitaran Nagpur Bharti 2025
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
विजतंत्री | 90 |
माहिती तंत्रज्ञान | 5 |
तारतंत्री | 44 |
कोपा (COPA) | 33 |
एकूण | 187 |
या भरतीसाठी वयोमर्यादा 18 ते 32 वर्षे ठेवण्यात आली आहे. उमेदवारांनी आपले वय निश्चित करण्यासाठी “Age Calculator” चा वापर करता येईल. शैक्षणिक पात्रता पदानुसार ठरवण्यात आली असून, इच्छुकांनी मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, विजतंत्री पदासाठी 10वी आणि ITI आवश्यक आहे.
अर्ज कसा करावा?
या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहेत. ऑनलाईन अर्ज सादर करताना उमेदवारांनी आपली शैक्षणिक प्रमाणपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. अर्ज फक्त अर्ज करण्याच्या अंतिम तारखेपूर्वीच ग्राह्य धरले जातील. यासाठी उमेदवारांनी https://www.mahadiscom.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी.
नोंदणीकृत उमेदवारांची निवड ही त्याच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार केली जाणार आहे. त्यामुळे अर्ज भरताना सर्व आवश्यक माहिती अचूक भरली गेली पाहिजे.
अधिक माहिती व अटींसाठी उमेदवारांनी कृपया अधिकृत PDF जाहिरात वाचावी.
महत्त्वाच्या तारखा:
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 मे 2025
अधिकृत संकेतस्थळ:
https://www.mahadiscom.in
Advertisement | Read PDF |
Online Application Link | Apply Online |
Official Website | Official Website |