महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लिमिटेड लातूरमध्ये विविध पदांची भरती, अर्ज करण्याची शेवटची संधी |MNS Bank Latur Bharti 2025

MNS Bank Latur Bharti 2025: महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लिमिटेड, लातूर यांच्या मुख्य कार्यालयामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ मे २०२५ अशी निश्चित करण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेमध्ये एकूण ६ रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. यात जनरल मॅनेजर, शाखा व्यवस्थापक, लिपिक आणि मार्केटिंग अधिकारी अशा पदांचा समावेश आहे. अर्ज ऑफलाइन किंवा ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करता येणार असून, आवश्यक कागदपत्रे संलग्न करून दिलेल्या पत्त्यावर किंवा ई-मेल आयडीवर पाठवावी लागतील.

रिक्त पदांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे – MNS Bank Latur Bharti 2025

पदाचे नावपदसंख्या
जनरल मॅनेजर01
शाखा व्यवस्थापक02
लिपिक02
मार्केटिंग अधिकारी01
एकूण06

या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता संबंधित पदाच्या आवश्यकतेनुसार निश्चित करण्यात आली आहे. मूळ जाहिरात वाचूनच अर्ज करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

शैक्षणिक पात्रतेचा तपशील –

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
जनरल मॅनेजरB.Com/M.Com, CA/CS, MBA Finance, Diploma in Banking, JAIIB/CAIIB
शाखा व्यवस्थापकB.Com/M.Com, GDC & A, DCM
लिपिकB.Com/M.Com
मार्केटिंग अधिकारीB.A/B.Com, MBA Marketing

नोकरीचे ठिकाण लातूर असून, उमेदवारांनी आपला अर्ज संपूर्ण माहिती आणि आवश्यक कागदपत्रांसह खालीलपैकी कोणत्याही एक माध्यमातून पाठवावा –
ऑफलाइन अर्ज पाठवण्याचा पत्ता:
मा. अध्यक्ष / कार्यकारी संचालक, महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लि., मुख्य कार्यालय, कव्हा रोड, मार्केट यार्ड, लातूर – ४१३५१२

ई-मेलने अर्ज पाठवण्यासाठी पत्ता:
maharashtranagaribank@gmail.com

अर्ज सादर करताना सर्व माहिती पूर्ण व अचूक भरावी. अपूर्ण माहितीच्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख ११ मे २०२५ असून, त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

या भरतीबाबत अधिक माहितीसाठी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता:
https://mnsbanklatur.in

PDF जाहिरातhttps://shorturl.at/esz04
अधिकृत वेबसाईटhttps://mnsbanklatur.in/