Ministry of Civil Aviation Vacancy 2026 | सरकारी नोकरीची संधी! नागरी विमान वाहतूक मंत्रालयात रिक्त पदांची भरती; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या (Ministry of Civil Aviation Vacancy 2026) अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो (BCAS) अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीद्वारे उपसंचालक (DD), उपसंचालक (गुप्तचर), सहाय्यक संचालक (AD) आणि विधी अधिकारी या पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. संबंधित पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व इतर अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा तसेच इतर अटी वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळे उमेदवारांनी आपल्या पात्रतेची खात्री करूनच अर्ज सादर करावा.

या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे उमेदवारांनी अर्जाचा नमुना भरून आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर वेळेत पाठविणे आवश्यक आहे. अर्जामध्ये सर्व माहिती अचूक व संपूर्ण भरावी. अपूर्ण, चुकीची किंवा आवश्यक माहिती नसलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो, दुसरा मजला, ‘ए’ ब्लॉक, उडान भवन, सफदरजंग विमानतळ, नवी दिल्ली – 110003 असा आहे. अर्ज निश्चित मुदतीपूर्वी संबंधित कार्यालयात पोहोचणे आवश्यक आहे.

भरतीसंदर्भातील अधिकृत अधिसूचनेनुसार अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवस असून 27 ऑगस्ट 2026 ही अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे. अंतिम तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

भरती प्रक्रियेसंदर्भातील अधिक माहिती, पदनिहाय पात्रता, आवश्यक अनुभव, अर्जाचा नमुना आणि इतर महत्त्वाच्या सूचना जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरील PDF जाहिरात अवश्य पाहावी.

भरतीचा तपशील : Ministry of Civil Aviation Vacancy 2026

घटकमाहिती
विभागनागरी विमान वाहतूक मंत्रालय
भरती संस्थानागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो (BCAS)
पदांची नावेउपसंचालक (DD), उपसंचालक (गुप्तचर), सहाय्यक संचालक (AD), विधी अधिकारी
एकूण पदसंख्या09
अर्ज पद्धतऑफलाईन
शैक्षणिक पात्रतापदानुसार (अधिकृत जाहिरात पहावी)
अर्ज पाठविण्याचा पत्तानागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो, दुसरा मजला, ‘ए’ ब्लॉक, उडान भवन, सफदरजंग विमानतळ, नवी दिल्ली – 110003
अर्ज करण्याची अंतिम तारीख27 ऑगस्ट 2026 (60 दिवस)
अधिकृत संकेतस्थळhttps://www.civilaviation.gov.in

अर्ज करण्याची पद्धत

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरून सादर करावा.
  • अधिकृत जाहिरात व अर्ज भरण्याच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
  • अर्जामध्ये आवश्यक ती सर्व माहिती पूर्णपणे भरावी.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत.
  • अर्ज अंतिम मुदतीपूर्वी दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
  • अपूर्ण किंवा चुकीची माहिती असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत PDF जाहिरात अवश्य पाहावी.
PDF जाहिरातhttps://shorturl.at/BRYK8
अधिकृत वेबसाईटhttps://www.civilaviation.gov.in/

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा