Dhule Mahanagarpalika Recruitment 2025: धुळे महानगरपालिका आरोग्य विभागात भरतीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले असून, एकूण 41 पदांची ही भरती आहे. या भरतीत सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी (अंशकालीन), पीएचएन सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, एएनएम, टीबीएचव्ही, एसटीएस, तसेच फिजिशियन, प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ आणि ईएनटी तज्ञ अशा विविध पदांचा समावेश आहे.
या सर्व पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 मे 2025 असून अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज मुख्य टपाल शाखा, धुळे महानगरपालिका, धुळे या पत्त्यावर पाठवायचा आहे. अर्ज करताना आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव, नोंदणी प्रमाणपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झालेली असावी. अपूर्ण अर्ज नाकारले जातील, अशी स्पष्ट सूचना जाहिरातीत देण्यात आली आहे.
या भरतीत शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असून, काही पदांसाठी एमबीबीएस, एमडी, डीएनबी अशा वैद्यकीय पदव्या अनिवार्य आहेत. तर काही पदांसाठी एएनएम, पीएचएन, बीएएमएस, बीडीएस, बीएचएमएस अशा पदव्या किंवा मान्यताप्राप्त आरोग्य शिक्षण व सल्ला कोर्स किंवा संगणक कोर्सची आवश्यकता आहे. काही पदांसाठी वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक आहे.
पगारही पदानुसार निश्चित करण्यात आले आहेत. उदा. सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ पदासाठी 75,000 रुपये, वैद्यकीय अधिकारी (अंशकालीन) साठी 30,000 रुपये, पीएचएन आरोग्य व्यवस्थापकासाठी 35,000 रुपये, तर एएनएमसाठी 18,000 रुपये मानधन ठरवण्यात आले आहे. मात्र तज्ज्ञ पदांसाठी वेतनश्रेणी जाहिरातीत नमूद करण्यात आलेली नाही.
निवड प्रक्रिया मुलाखतीच्या आधारे होणार असून, या मुलाखती 28 मे 2025 रोजी अटल बिहारी वाजपेयी सभागृह, नवीन प्रशासकीय इमारत, धुळे महानगरपालिका येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांनी आपले अर्ज वेळेत सादर करून निर्धारित तारखेला मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
या भरतीबाबत अधिक माहिती आणि सविस्तर अटी व शर्तींसाठी उमेदवारांनी महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.dhulecorporation.org भेट देऊन मूळ जाहिरात वाचावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
PDF जाहिरात | https://shorturl.at/dADLT |
अधिकृत वेबसाईट | www.dhulecorporation.org |