महाराष्ट्र शासनाच्या सेवेत नोकरी करण्याची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC Group C Recruitment 2026) यांनी महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक, सहायक मोटार वाहन निरीक्षक आणि गट-क लिपिक-टंकलेखक या पदांच्या एकूण 2619 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज प्रक्रिया 27 जून 2026 पासून सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांना 17 जुलै 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे. शासन सेवेत स्थिर आणि प्रतिष्ठित करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
भरतीचा संक्षिप्त तपशील : MPSC Group C Recruitment 2026
| बाब | माहिती |
|---|---|
| भरती संस्था | महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) |
| परीक्षा | महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 |
| पदांची नावे | उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक, सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-क लिपिक-टंकलेखक |
| एकूण पदसंख्या | 2619 |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन |
| नोकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
| अर्ज सुरू | 27 जून 2026 |
| अर्जाची अंतिम तारीख | 03 ऑगस्ट 2026 |
शैक्षणिक पात्रता
या भरतीतील प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित पदासाठी आवश्यक पात्रता, अनुभव तसेच इतर अटी अधिकृत जाहिरातीत तपासणे आवश्यक आहे. चुकीची किंवा अपूर्ण माहिती भरल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो.
वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 19 ते 38 वर्षे दरम्यान असावे. शासनाच्या नियमानुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत लागू असलेली सवलत मिळणार आहे.
अर्ज शुल्क
| प्रवर्ग | शुल्क |
|---|---|
| खुला वर्ग | ₹394 |
| मागासवर्गीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग | ₹294 |
अर्ज करताना लक्षात ठेवावयाच्या महत्त्वाच्या सूचना
उमेदवारांनी अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीनेच सादर करायचा आहे. अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक आणि अचूक भरावी. आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या प्रती निर्धारित स्वरूपात अपलोड करणे बंधनकारक आहे. अपूर्ण माहिती, चुकीची माहिती किंवा आवश्यक कागदपत्रे न जोडल्यास अर्ज अपात्र ठरू शकतो.
अर्जाची अंतिम तारीख 17 जुलै 2026 असल्यामुळे शेवटच्या क्षणी तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी उमेदवारांनी वेळेत अर्ज पूर्ण करावा. तसेच संबंधित पदाची पात्रता, परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम, आरक्षण, शुल्क आणि इतर सर्व अटी जाणून घेण्यासाठी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये नोकरीची संधी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती महत्त्वाची असून, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे.
MPSC Group C Recruitment 2026 | तलाठी, कर सहायक, लिपिकसह 5707 पदांची MPSC मेगाभरती; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC Group C Recruitment 2026) गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत विविध पदांच्या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक, सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-क लिपिक-टंकलेखक आणि ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) या पदांसह एकूण 5,707 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीमधील 1,539 पदे ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) या पदासाठी राखीव असल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. अर्ज प्रक्रिया 27 जून 2026 पासून सुरू झाली असून, उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 3 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. यापूर्वी अर्जाची अंतिम तारीख 17 जुलै 2026 होती. मात्र आयोगाने मुदतवाढ दिल्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अतिरिक्त वेळ उपलब्ध झाला आहे.
MPSC गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 च्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे. मुख्य परीक्षेचा दिनांक आयोगाकडून स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचेही भरतीच्या जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे.
भरतीचा तपशील : MPSC Group C Recruitment 2026
| बाब | माहिती |
|---|---|
| भरती संस्था | महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) |
| परीक्षेचे नाव | महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 |
| एकूण पदसंख्या | 5,707 |
| तलाठी पदे | 1,539 |
| पदे | उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक, सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-क लिपिक-टंकलेखक, ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) |
| नोकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
| अर्ज पद्धती | ऑनलाइन |
| अर्ज सुरू | 27 जून 2026 |
| अंतिम तारीख | 3 ऑगस्ट 2026 |
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता संबंधित पदानुसार वेगवेगळी आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून संबंधित पदासाठी आवश्यक पात्रता तपासणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 19 ते 38 वर्षे असावे. शासनाच्या नियमानुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत लागू असलेली सवलत मिळणार आहे.
अर्ज शुल्क
| प्रवर्ग | शुल्क |
|---|---|
| खुला प्रवर्ग | ₹394 |
| मागासवर्गीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग | ₹294 |
अर्ज करताना लक्षात ठेवावयाच्या बाबी
- अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील.
- अर्जातील सर्व माहिती अचूक आणि पूर्ण भरावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करणे अनिवार्य आहे.
- अपूर्ण माहिती असलेले अर्ज अपात्र ठरविण्यात येऊ शकतात.
- अंतिम मुदतीपूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
हेही वाचा : NFDC Mumbai Bharti 2026 | सरकारी नोकरीची संधी! नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
Kendriya Vidyalaya Kamptee Bharti 2026 | शिक्षक होण्याची संधी! केंद्रीय विद्यालय कामठी येथे विविध पदांसाठी २९ जुलै रोजी थेट मुलाखती
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी MPSC गट-क भरती 2026 ही मोठी संधी मानली जात आहे. विशेषतः तलाठी पदांच्या मोठ्या संख्येमुळे ग्रामीण भागातील तसेच राज्यभरातील हजारो उमेदवार या भरतीकडे लक्ष ठेवून आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि सर्व अटी व पात्रता तपासूनच अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
| PDF जाहिरात तलाठी भरती (नवीन) | तलाठी अपडेट जाहिरात लिंक |
| PDF जाहिरात | https://lnk.ua/DE2pZU65A |
| ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/ocFTc |
| अधिकृत वेबसाईट | https://mpsc.gov.in |
