मुदतवाढ: १५३९ तलाठी पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू, जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती | Talathi Bharti 2026 Update

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) तांत्रिक अडचणींमुळे महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ मधील तलाठीसह ५,७०७ पदांच्या ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या मुदतीत १० ऑगस्ट २०२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत) वाढ केली आहे. परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख १३ ऑगस्ट २०२६ आहे.

महत्त्वाच्या तारखा आणि तपशील

  • ऑनलाईन अर्ज करण्याची नवीन अंतिम तारीख: १० ऑगस्ट २०२६
  • ऑनलाईन फी भरण्याची अंतिम तारीख: १३ ऑगस्ट २०२६
  • पूर्व परीक्षा दिनांक: २५ ऑक्टोबर २०२६
  • एकूण पदे: ५,७०७ (ज्यात १,५३९ तलाठी पदे समाविष्ट आहेत)

MPSC Group C Talathi Bharti 2026 Application Extension


तलाठी भरतीचे मागील परिक्षांचे सर्व Question Papers आणि Answer Keys, तसेच MPSC Group-C मधील सर्व Non-Technical पदांच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका – Google Drive Link


Talathi Bharti 2026 Update: तलाठी भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या राज्यातील हजारो उमेदवारांसाठी अखेर दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या तलाठी भरतीबाबत महत्त्वाची घडामोड झाली असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Talathi Bharti 2026) ग्रुप ‘C’ भरती प्रक्रियेत नवीन पदांचा समावेश करत संबंधित परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. या परिपत्रकानुसार “ग्राम महसूल अधिकारी (तलाठी)” या पदाच्या एकूण १५३९ जागांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांना १० ऑगस्ट २०२६ पर्यंत (मुदतवाढ) ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

यंदाची तलाठी भरती अनेक दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. कारण प्रथमच तलाठी भरतीची परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी परीक्षेच्या नवीन स्वरूपाची माहिती घेऊन त्यानुसार तयारी करणे आवश्यक आहे.

भरतीची महत्त्वाची माहिती : Talathi Bharti 2026 Update

बाबतपशील
पदाचे नावतलाठी (ग्राम महसूल अधिकारी)
एकूण पदसंख्या१५३९
शैक्षणिक पात्रतापदवीधर (सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी)
वयोमर्यादा१८ ते ३८ वर्षे (राखीव प्रवर्गासाठी सवलत – अधिकृत PDF पाहावी)
अर्ज पद्धतऑनलाइन (MPSC पोर्टलद्वारे)
अर्जाची अंतिम तारीख१० ऑगस्ट २०२६
परीक्षा शुल्कखुला प्रवर्ग – रु. ५४४, राखीव प्रवर्ग – रु. ३४४
अधिकृत संकेतस्थळmpsconline.gov.in

हेही वाचा : Rajarambapu Sahakari Bank Ltd Sangli Bharti 2026 | राजारामबापू सहकारी बँक सांगलीमध्ये भरती; १० ऑगस्टपर्यंत ऑफलाईन अर्ज जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Sindhudurg Anganwadi Bharti 2026 | महिलांसाठी नोकरीची संधी: सिंधुदुर्ग अंगणवाडी मदतनीस भरती; पात्रता आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

तलाठी भरतीच्या परीक्षेच्या स्वरूपातही काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे. परीक्षेत एकूण १०० प्रश्न विचारले जाणार असून त्यासाठी १०० गुण निश्चित करण्यात आले आहेत. या परीक्षेत नकारात्मक गुणांकन (Negative Marking) लागू असणार आहे. त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देताना उमेदवारांनी काळजीपूर्वक निर्णय घेणे आवश्यक ठरणार आहे.

परीक्षेचा कालावधी एक तास असणार आहे. मराठी विषयाची प्रश्नपत्रिका इयत्ता बारावीच्या स्तराच्या समान असेल, तर उर्वरित सर्व विषयांचे प्रश्न पदवी स्तराच्या दर्जानुसार विचारले जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी अभ्यासाचे योग्य नियोजन करून तयारी करणे गरजेचे आहे.

तलाठी भरतीसंदर्भातील संपूर्ण माहिती अधिकृत परिपत्रक आणि संबंधित लिंकवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी TCS पद्धतीनुसार मोफत मॉक टेस्टची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी मोफत नोंदणी करून दररोज नवीन प्रश्नपत्रिका सोडवाव्यात, जेणेकरून मुख्य परीक्षेची तयारी अधिक प्रभावीपणे करता येईल.

याशिवाय नवीन निगेटिव्ह मार्किंग पद्धतीनुसार तयार करण्यात आलेली टेस्ट सिरीजही उपलब्ध असून उमेदवारांनी नियमित सराव करून परीक्षेतील अचूकता आणि वेळेचे नियोजन सुधारण्यावर भर द्यावा. तलाठी भरतीची ही प्रक्रिया राज्यातील महसूल विभागातील महत्त्वाच्या भरतींपैकी एक मानली जात असल्याने पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज पूर्ण करून परीक्षेच्या तयारीला वेग देणे आवश्यक आहे.

PDF जाहिरात  https://lnk.ua/DE2pZU65A
ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/ocFTc
अधिकृत वेबसाईटhttps://mpsc.gov.in

1. परीक्षा स्वरूप व निवड प्रक्रिया (Selection Process)

  • निवड पद्धत: संयुक्त पूर्व परीक्षा (१०० गुण) आणि स्वतंत्र मुख्य परीक्षा (४०० गुण).
  • परीक्षेचे माध्यम: मराठी व इंग्रजी.
  • परीक्षेचे स्वरूप: वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQs).
  • कालावधी: १ तास (६० मिनिटे).
  • परीक्षेचा दर्जा: पदवी स्तर (Graduation standard).

2. संयुक्त पूर्व परीक्षा पेपर पॅटर्न (Prelims Exam Pattern)

घटकाचे नावप्रश्न संख्याएकूण गुणकालावधी
सामान्य क्षमता चाचणी (General Ability Test)१००१००१ तास (६० मिनिटे)

3. नकारात्मक गुणदान (Negative Marking Rule)

  • नकारात्मक गुण: २५% किंवा १/४ (1/4th) Negative Marking लागू आहे.
  • प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण (१/४ गुण) एकूण मिळालेल्या गुणांमधून वजा केले जातील.
  • एकापेक्षा जास्त वर्तुळे रंगवल्यास ते उत्तर चुकीचे मानून नकारात्मक गुण लागू केले जातील.
  • अनुत्तरित प्रश्नांसाठी (उत्तर न दिलेल्या प्रश्नांसाठी) कोणतेही गुण वजा केले जाणार नाहीत.

4. पूर्व परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम (Detailed Syllabus)

संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये ‘सामान्य क्षमता चाचणी’ अंतर्गत खालील ८ घटकांवर प्रश्न विचारले जातात:

  1. इतिहास:
    • आधुनिक भारताचा इतिहास (विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संदर्भासह).
  2. भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह):
    • पृथ्वी, जग, हवामान, अक्षांश व रेखांश.
    • महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, महत्त्वाचे शहरे, नद्या आणि उद्योगधंदे.
  3. अर्थव्यवस्था:
    • भारतीय अर्थव्यवस्था: राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति इत्यादी.
    • शासकीय अर्थव्यवस्था: अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी.
  4. चालू घडामोडी:
    • जागतिक, भारतातील आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या समकालीन घडामोडी.
  5. राज्यशास्त्र (Polity):
    • भारतीय राज्यघटना आणि राज्य कारभाराशी संबंधित मूलभूत घटक, पंचायत राज.
  6. सामान्य विज्ञान (General Science):
    • भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), प्राणिशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany) आणि आरोग्यशास्त्र (Hygiene).
  7. अंकगणित (Arithmetic):
    • बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी मूलभूत घटक.
  8. बुद्धिमापन चाचणी (Intelligence Test):
    • उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचे तर्कसंगत प्रश्न (Logical Reasoning).

अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे (Ready Keep List)

अर्ज भरण्यापूर्वी खालील गोष्टी आणि कागदपत्रे डिजिटल फॉरमॅटमध्ये (PDF/JPEG) सोबत ठेवा:

  1. वैयक्तिक माहिती: आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदार ओळखपत्र.
  2. शैक्षणिक कागदपत्रे: १० वी, १२ वी आणि पदवी (Graduation) गुणपत्रक/प्रमाणपत्र.
  3. प्रमाणपत्रे (लागू असल्यास):
    • अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
    • जात प्रमाणपत्र (Cast Certificate) व जात वैधता प्रमाणपत्र (Non-Creamy Layer – NCL)
    • अपंगत्व / महिला आरक्षण / खेळाडू / माजी सैनिक प्रमाणपत्र
  4. फोटो व स्वाक्षरी: पासपोर्ट साईझ रंगीत फोटो आणि पांढऱ्या कागदावर केलेली सही (स्कॅन केलेली).
  5. मोबाईल नंबर व ई-मेल ID: चालू असलेला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी.

1.MPSC च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या:खाते तयार करणे किंवा लॉग इन करणे.

  • MPSC च्या अधिकृत mpsconline.gov.in या पोर्टलला भेट द्या.
  • जर तुमचे याआधी खाते नसेल, तर ‘New User Registration’ वर क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी वापरून रजिस्ट्रेशन करा.
  • जर आधीच खाते असेल, तर User ID / Email ID / Mobile Number आणि Password टाकून Login करा.

2.प्रोफाईल तयार/अद्ययावत करा (Profile Creation / Update): 6 टप्प्यांमध्ये माहिती भरा.

लॉग इन केल्यानंतर तुमचे प्रोफाइल पूर्ण नसल्‍यास ते ६ टप्प्यांत पूर्ण करा:

  1. Personal Information: नाव, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल नंबर, ई-मेल.
  2. Address Details: कायमचा आणि सध्याचा पत्ता.
  3. Other Details: जात प्रवर्ग, समांतर आरक्षण, दिव्यांगत्व इत्यादी माहिती.
  4. Qualification Details: 10 वी, 12 वी आणि पदवीची (Graduation) सविस्तर माहिती व गुण.
  5. Experience Details: अनुभव असल्यास त्याची माहिती (नसल्यास Skip करा).
  6. Upload Photo & Signature: सूचनांनुसार फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.

3.परीक्षेची निवड करा (Select Online Application):अर्ज प्रक्रिया सुरू करा.

  • प्रोफाइल पूर्ण झाल्यानंतर मेनू मधील ‘Online Application’ या पर्यायावर क्लिक करा.
  • तेथे उपलब्ध जाहिरातींच्या यादीमधून ‘Maharashtra Non-Gazetted Group B and Group C Services Combined Preliminary Examination’ (संयुक्त पूर्व परीक्षा) हा पर्याय निवडा.
  • ‘Check Eligibility’ वर क्लिक करून तुम्ही पात्र आहात का ते तपासा.

4.पद व परीक्षा केंद्र निवडा:Preferences & Exam Center.

  • पात्र ठरल्यानंतर ‘Apply’ बटनावर क्लिक करा.
  • दिलेल्या पर्यायांमधून तुमच्या आवडीचे/सोयीचे परीक्षेचे शहर/केंद्र (Exam Center) निवडा.
  • भरलेली सर्व माहिती आणि अटी व शर्ती (Terms and Conditions) वाचून Checkbox वर टिक करा.

5.परीक्षा शुल्क भरा (Pay Exam Fee):Payment Online/Offline.

  • सर्व माहिती तपासून ‘Submit’ करा.
  • त्यानंतर ‘Pay Fee’ चा पर्याय दिसेल.
  • ऑनलाईन पेमेंट मोड निवडा: Net Banking, Debit Card, Credit Card, किंवा UPI (Google Pay, PhonePe) द्वारे परीक्षा शुल्क भरा.

6.पावती व अर्जाची प्रिंट काढा:भविष्यातील संदर्भासाठी.

  • पेमेंट यशस्वी (Success) झाल्यानंतर तुमच्या अर्जाची Acknowledgement Receipt (पावती) आणि Application Form डाउनलोड करून सुरक्षित ठेवा किंवा प्रिंट काढून ठेवा.

महत्त्वाची टीप: अर्ज सबमिट करण्यापूर्वी भरलेली सर्व माहिती (विशेषतः नाव, जन्मतारीख, जात प्रवर्ग आणि गुण) पुन्हा एकदा व्यवस्थित तपासून घ्या, कारण फी भरल्यानंतर अर्जात बदल करता येत नाही.


ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा