Ministry Of Jal Shakti Bharti 2025: जलशक्ती मंत्रालयाने राष्ट्रीय धरण सुरक्षा प्राधिकरणांतर्गत संचालक, उपसंचालक आणि सहाय्यक संचालक या पदांसाठी मोठी भरती जाहीर केली असून एकूण 55 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने होणार असून इच्छुक उमेदवारांना जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसांच्या आत, म्हणजेच 19 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.
या भरतीत संचालक पदासाठी 08 जागा, उपसंचालक पदासाठी 18 जागा, तर सहाय्यक संचालक पदासाठी 29 जागा उपलब्ध आहेत. प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर अटी वेगवेगळ्या असल्याने उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वेतनश्रेणी देखील पदानुसार आकर्षक असून संचालक पदासाठी ₹1,23,000 ते ₹2,15,900, उपसंचालकांसाठी ₹67,700 ते ₹2,08,700, तर सहाय्यक संचालक पदासाठी ₹56,100 ते ₹1,77,500 इतके वेतन निश्चित करण्यात आले आहे.
अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपला पूर्ण भरलेला अर्ज अवर सचिव, राष्ट्रीय धरण सुरक्षा प्राधिकरण (NDSA), 8वा मजला, सेवा भवन, आर.के. पुरम, नवी दिल्ली – 110066 या पत्त्यावर पाठवायचा आहे. कोणत्याही प्रकारची चूक टाळण्यासाठी अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी योग्यरीतीने सादर करणे आवश्यक आहे. भरतीसंबंधित सविस्तर माहिती आणि आवश्यक कागदपत्रांची यादी मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून त्यासाठी उमेदवारांनी jalshakti-dowr.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी.
या भरतीमुळे अनुभवी व पात्र उमेदवारांना जलशक्ती मंत्रालयात काम करण्याची संधी उपलब्ध होत असून इच्छुकांनी ही सुवर्णसंधी हातून जाऊ न देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
| PDF जाहिरात | https://shorturl.at/xdcYS |
| अधिकृत वेबसाईट | https://www.jalshakti-dowr.gov.in/ |
