Cotton Corporation of India Bharti 2025: कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होत आहे. व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (मार्केटिंग), व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (अकाउंट्स), ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह आणि ज्युनियर असिस्टंट (कॉटन टेस्टिंग लॅब) या पदांसाठी एकूण 147 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
Cotton Corporation of India Bharti 2025
अर्ज करण्याची प्रक्रिया 9 मे 2025 पासून सुरू होत असून 24 मे 2025 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. उमेदवारांनी वेळेत अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. अपूर्ण अर्ज किंवा आवश्यक माहिती नसलेले अर्ज अपात्र ठरवले जाणार आहेत.
या भरतीअंतर्गत व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (मार्केटिंग) आणि व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (अकाउंट्स) प्रत्येकी 10 जागा, ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्हसाठी सर्वाधिक 125 जागा तर ज्युनियर असिस्टंट (कॉटन टेस्टिंग लॅब) साठी 2 जागा उपलब्ध आहेत. शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगळी आहे, त्यामुळे मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://cotcorp.org.in/) भेट द्यावी. भरतीबाबत अधिक माहिती आणि अचूक अटी-शर्ती जाणून घेण्यासाठी अधिकृत PDF जाहिरात अवश्य वाचावी.
PDF जाहिरात | https://shorturl.at/zsyJH |
ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/eAIX3 |
अधिकृत वेबसाईट | https://cotcorp.org.in/ |