Maharashtra Job Fair 2026 | खुशखबर! महाराष्ट्रात १ हजार रोजगार मेळावे; लाखो युवकांना नोकरीची संधी जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

राज्यातील युवक-युवतींना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध(Maharashtra Job Fair 2026)करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने ३१ मार्च २०२७ पर्यंत राज्यभरात एक हजार रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे रोजगार शोधणाऱ्या तरुणांना विविध कंपन्या, उद्योग आणि संस्थांमध्ये थेट नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांना आवश्यक कौशल्य प्रशिक्षण आणि पूर्वतयारीही दिली जाणार आहे. या रोजगार मेळाव्यांची माहिती राज्यातील प्रत्येक गरजू युवकापर्यंत पोहोचावी यासाठी समाजातील सर्व घटकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

मंत्रालयात मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय रोजगार मेळावा समितीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यभरात आयोजित करण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्यांच्या नियोजनासह त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले की, केवळ आयटीआयमधील विद्यार्थ्यांपुरते हे अभियान मर्यादित न ठेवता इतर महाविद्यालयांतील विद्यार्थी, अपस्किलिंगची गरज असलेले तरुण, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांपर्यंतही या उपक्रमाची माहिती पोहोचवली जाईल. राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यात रोजगार मेळाव्यांची माहिती देण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.

रोजगार मेळाव्यांमध्ये सहभागी होणाऱ्या युवकांना रोजगाराचे महत्त्व, तसेच स्वयंरोजगाराच्या संधींबाबत जागरूक करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून समुपदेशन केले जाईल. या प्रक्रियेत तरुणांना रोजगारक्षम बनविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. रोजगार मेळाव्यापूर्वी दोन आठवड्यांचे पूर्व-प्रशिक्षण देण्याची संकल्पनाही यावेळी मांडण्यात आली आहे.

पहिल्या आठवड्यात उमेदवारांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, शिष्टाचार, प्रभावी बायोडाटा तयार करणे, मुलाखतीसाठी आवश्यक संभाषण कौशल्ये आणि आत्मविश्वास वाढविण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. दुसऱ्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या अॅप्टिट्यूड टेस्टनुसार विविध क्षेत्रांतील प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये इलेक्ट्रिसिटी, प्लंबिंग, रिसेप्शनिस्ट, मार्केटिंग अशा रोजगाराभिमुख क्षेत्रांतील प्रात्यक्षिकांचा समावेश असेल. त्यामुळे उमेदवारांना नोकरीसाठी आवश्यक कौशल्ये प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळणार आहे.

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले की, केवळ रोजगार मेळावे आयोजित करून अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत. उमेदवारांना योग्य मार्गदर्शन, कौशल्य प्रशिक्षण आणि पूर्वतयारी मिळाल्यास रोजगार मेळाव्यांमधील यशाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढू शकते. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला मेळाव्यापूर्वी आवश्यक प्रशिक्षण देण्यावर विभागाचा विशेष भर राहणार आहे.

या संपूर्ण उपक्रमाच्या प्रभावी नियोजनासाठी आणि अंमलबजावणीसाठी संबंधित विभागांचे अधिकारी, समन्वय समिती तसेच विभागीय स्तरावरील यंत्रणांनी एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विभागीय अधिकारी आणि समन्वय समितीची संयुक्त बैठक घेऊन प्रत्येक रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी आवश्यक नियोजन केले जाणार आहे. समाजातील सर्व घटकांचा सहभाग वाढवून रोजगारनिर्मितीची प्रक्रिया अधिक व्यापक आणि परिणामकारक करण्यावर सरकारचा भर राहणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

राज्यातील युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे, त्यांना उद्योगांच्या गरजेनुसार कौशल्यसंपन्न बनविणे आणि स्वयंरोजगारासाठीही सक्षम करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे ३१ मार्च २०२७ पर्यंत आयोजित करण्यात येणारे एक हजार रोजगार मेळावे हे राज्यातील लाखो युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणारे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

हेही वाचा : Pune Job Fair 2026 | पुण्यात ऑगस्टमध्ये दोन भव्य रोजगार मेळावे! १० वी, १२ वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर उमेदवारांना संधी; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Pune ZP Bharti Jobs Apply Now | 12वी पास महिलांसाठी खुशखबर! पुणे जिल्ह्यात अंगणवाडी पदांची भरती; अर्ज सुरू, पात्रता आणि संपूर्ण माहिती

रोजगार मेळाव्याची महत्त्वाची माहिती : Maharashtra Job Fair 2026

बाबमाहिती
उपक्रमराज्यभर १,००० रोजगार मेळावे
अंतिम कालावधी३१ मार्च २०२७
आयोजककौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग
उद्देशयुवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे
पूर्व प्रशिक्षण२ आठवड्यांचे कौशल्य व पूर्व-रोजगार प्रशिक्षण
पहिला आठवडापर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, शिष्टाचार, बायोडाटा, संभाषण कौशल्य
दुसरा आठवडाअॅप्टिट्यूडनुसार इलेक्ट्रिसिटी, प्लंबिंग, रिसेप्शनिस्ट, मार्केटिंग आदी क्षेत्रांचे प्रात्यक्षिक
लाभार्थीआयटीआय, इतर महाविद्यालयांचे विद्यार्थी, अपस्किलिंगची गरज असलेले तरुण
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
नोंदणीhttps://shorturl.at/aotw0   

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा