मुंबई विद्यापीठातील शैक्षणिक पदांच्या भरतीची अंतिम मुदत वाढवली | Mumbai University Bharti 2025

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

Mumbai University Bharti 2025: मुंबई विद्यापीठातील अधिष्ठाता, प्राध्यापक, सहप्राध्यापक/उपग्रंथपाल तसेच सहाय्यक प्राध्यापक/सहाय्यक ग्रंथपाल या महत्त्वाच्या शैक्षणिक पदांच्या भरतीसाठी सुरू असलेल्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. पूर्वी ३ डिसेंबर ही अंतिम तारीख असताना आता अर्ज सादर करण्याचा कालावधी वाढवून १८ डिसेंबर २०२५ (सायं. ५ वाजेपर्यंत) असा करण्यात आला आहे.

ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर उमेदवारांनी त्याची प्रिंट प्रत आणि आवश्यक कागदपत्रांचे तीन संच फोर्ट येथील विद्यापीठाच्या रूम क्रमांक २५, इनवर्ड सेक्शन येथे जमा करणे अनिवार्य आहे. ही प्रत्यक्ष कागदपत्रे जमा करण्याची अंतिम मुदतही वाढवून २४ डिसेंबर २०२५ (सायं. ५ वाजेपर्यंत) अशी ठरवण्यात आली आहे. भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्यांची माहिती लवकरच जाहीर होणार असल्याचे विद्यापीठाने कळविले आहे.

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator 

या भरतीत एकूण १५२ पदे असून विविध शैक्षणिक श्रेणींमध्ये पदांची उपलब्धता खालीलप्रमाणे आहे:

Mumbai University Vacancy 2025

पदाचे नावपदसंख्या
विद्याशाखांचे अधिष्ठाता04
प्राध्यापक21
सहयोगी प्राध्यापक / उपग्रंथपाल54
सहाय्यक प्राध्यापक / सहाय्यक ग्रंथपाल73

उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रता UGC नियमावलीनुसार असून प्राध्यापक वर्गासाठी Ph.D., सहयोगी प्राध्यापकांसाठी उत्कृष्ट शैक्षणिक रेकॉर्डसह Ph.D., तर ग्रंथपाल पदांसाठी Library Science/Information Science मध्ये किमान 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. सहाय्यक प्राध्यापकांसाठी संबंधित विषयातील मास्टर्स पदवीत 55% गुण अनिवार्य आहेत.

वेतनश्रेणी Pay Matrix AL-10 ते AL-14 दरम्यान असून अधिष्ठाता व प्राध्यापक पदांसाठी एंट्री पे ₹1,44,200, सहयोगी प्राध्यापक/उपग्रंथपालांसाठी ₹1,31,400 आणि सहाय्यक पदांसाठी ₹57,700 निश्चित आहे.

अर्ज भरताना उमेदवारांनी सर्व माहिती अचूक भरावी, अन्यथा अपूर्ण अर्ज नाकारले जाणार आहेत. अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी ₹500 आणि राखीव प्रवर्गासाठी ₹250 इतके आहे. अर्ज करण्यासाठी विद्यापीठाची अधिकृत वेबसाईट mu.ac.in वापरता येईल.

अर्जाच्या हार्ड कॉपी स्वीकारण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर कोणतीही विनंती विचारात घेतली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Mumbai University Bharti 2025

शुद्धिपत्रकhttps://shorturl.at/A8rGR
PDF जाहिरातhttps://shorturl.at/5VjF8
ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/awHEp
अधिकृत वेबसाईटhttps://mu.ac.in/

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा