SGBAU Amravati Bharti 2025: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या दोन वेगवेगळ्या संस्थांमध्ये एकूण 25 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. बुलडाणा येथील श्री संत गजानन महाराज फार्मसी महाविद्यालयात प्राचार्य पदासाठी तर अमरावतीतील भारतीय महाविद्यालयात संचालक, ग्रंथपाल आणि सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
1) श्री संत गजानन महाराज फार्मसी महाविद्यालय, बुलडाणा
या महाविद्यालयात प्राचार्य पदाची 01 रिक्त जागा असून अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जातील. उमेदवारांकडे Ph.D पदवी असणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 डिसेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. अर्ज खालील पत्त्यावर पाठवायचा आहे. अध्यक्ष, श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मेसी, सागवान रोड, बुलढाणा – 443002
या महाविद्यालयात संचालक, ग्रंथपाल आणि 22 सहाय्यक प्राध्यापक अशा एकूण 24 पदांची भरती आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे असून अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 20 दिवस (16 डिसेंबर 2025) आहे. या पदांसाठी मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया होणार असून मुलाखतीचे ठिकाण असे आहे — मा. सचिव, ग्रामीण विकास शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ, खडकी, अकोला: श्रीमती पी.डी. पाटील महाविद्यालय, खडकी (बीके), अकोला
SGBAU – अमरावती पदांचे तपशील
पदाचे नाव
पदसंख्या
संचालक
01
ग्रंथपाल
01
सहाय्यक प्राध्यापक
22
अर्ज कसा करावा (दोन्ही जाहिरातींसाठी सामान्य सूचना)
अर्ज फक्त ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जातील.
अर्जात सर्व आवश्यक कागदपत्रांची माहिती पूर्णपणे भरावी; अपूर्ण अर्ज नाकारले जातील.