महाराष्ट्रातील विविध शासकीय विभागांमध्ये भरती प्रक्रिया राबविण्याचे(Charity Commissioner Maharashtra Bharti 2026) काम सुरू असतानाच नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी धर्मदाय आयुक्तालयाशी संबंधित एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाच्या विभागांपैकी एक असलेल्या धर्मदाय आयुक्तालयात मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती प्रक्रिया राबविण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. उपलब्ध माहितीनुसार सुमारे ६१५ पदांच्या भरतीची नवीन जाहिरात लवकरच येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांचे या भरतीकडे लक्ष लागले आहे.
धर्मदाय आयुक्तालय हे राज्यातील सार्वजनिक न्यास आणि चॅरिटेबल संस्थांच्या कामकाजावर देखरेख ठेवणारे महत्त्वाचे प्रशासनिक यंत्रणा आहे. सार्वजनिक न्यास आणि धर्मादाय संस्थांची नोंदणी, वार्षिक लेखापरीक्षण, संस्थांच्या आर्थिक व्यवहारांवर देखरेख, विश्वस्तांमधील बदल, संस्थांच्या मालमत्तेचे व्यवस्थापन तसेच गैरव्यवहारासंदर्भातील तक्रारींची चौकशी अशी विविध महत्त्वाची कामे या विभागामार्फत केली जातात. राज्यात धर्मादाय संस्था आणि सार्वजनिक न्यासांची संख्या वाढत असताना त्यानुसार विभागातील मनुष्यबळ वाढले नसल्याने उपलब्ध अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार पडत आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार राज्यभरात धर्मदाय आयुक्तालयातील एकूण १,४७६ पदे मंजूर असून त्यापैकी ८४८ पदे भरलेली आहेत, तर ६२८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे मंजूर पदांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. याचा परिणाम विभागाच्या दैनंदिन कामकाजावर होत असून विविध प्रकरणे प्रलंबित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गट-अ ते गट-डपर्यंत पदे रिक्त : Charity Commissioner Maharashtra Bharti 2026
धर्मदाय आयुक्तालयात गट-अ पासून गट-डपर्यंत विविध स्तरांवर पदे रिक्त आहेत. विशेषतः सहाय्यक धर्मदाय आयुक्त, धर्मदाय निरीक्षक, लिपिकीय कर्मचारी आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. संस्थांची नोंदणी, वार्षिक अहवाल तपासणी, बदल प्रस्ताव, मालमत्ता नोंदी तसेच तक्रारींची चौकशी यांसारखी कामे मोठ्या प्रमाणावर केली जात असल्याने मनुष्यबळाचा अभाव हा विभागासाठी महत्त्वाचा प्रश्न ठरत आहे.
अनेक जिल्ह्यांमध्ये उपलब्ध अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आल्याने एका अधिकाऱ्याला दोन ते तीन जिल्ह्यांतील कामकाज पाहावे लागत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित संस्थांच्या प्रकरणांवर निर्णय घेण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. रिक्त पदांची संख्या लक्षात घेता नवीन भरती झाल्यास विभागातील कामकाजाचा ताण कमी होण्यास मदत होऊ शकते.
विविध विभागांमध्ये किती पदे रिक्त?
उपलब्ध आकडेवारीनुसार राज्यातील विविध विभागांमध्ये मंजूर, भरलेली आणि रिक्त पदांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे.
| विभाग | मंजूर पदे | भरलेली पदे | रिक्त पदे |
|---|---|---|---|
| नाशिक | १३१ | ५४ | ७७ |
| छत्रपती संभाजीनगर | १६४ | १११ | ५३ |
| लातूर | ११३ | ५३ | ६० |
| कोल्हापूर | १४१ | ७६ | ६५ |
| पुणे | ११९ | १०७ | १२ |
| मुंबई | ३७७ | १९४ | १८३ |
| नागपूर | १८९ | १२८ | ६१ |
| अमरावती | १६२ | १२५ | ३७ |
| एकूण | १,४७६ | ८४८ | ६२८ |
हेही वाचा : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती २०२६; विविध पदांच्या ७७ रिक्त जागांसाठी संधी | SGBAU Amravati Bharti 2026
२०२६ मध्ये फ्रेशर्ससाठी आयटी क्षेत्रात नोकरीच्या संधी; ‘या’ ९ कंपन्यांमध्ये करिअरची दारे खुली | IT Jobs for Freshers 2026
या आकडेवारीत सर्वाधिक रिक्त पदे मुंबई विभागात असल्याचे दिसून येते. मुंबई विभागात ३७७ मंजूर पदांपैकी १९४ पदे भरलेली असून १८३ पदे रिक्त आहेत. त्यानंतर नाशिक विभागात १३१ मंजूर पदांपैकी ७७ पदे रिक्त आहेत. लातूरमध्ये ६०, नागपूरमध्ये ६१ आणि कोल्हापूरमध्ये ६५ पदे रिक्त असल्याचे आकडेवारीत नमूद आहे. अमरावती विभागात ३७, छत्रपती संभाजीनगरमध्ये ५३, तर पुणे विभागात १२ पदे रिक्त आहेत.
विशेषतः नाशिक विभागातील परिस्थिती लक्षवेधी आहे. नाशिक विभागात १३१ पदे मंजूर असून त्यापैकी केवळ ५४ पदे भरलेली आहेत, तर तब्बल ७७ पदे रिक्त आहेत. नाशिक जिल्ह्यात ५४ मंजूर पदांपैकी ४१ पदे भरलेली असून १३ पदे रिक्त आहेत. धुळे जिल्ह्यात २८ मंजूर पदांपैकी १८ पदे, जळगाव जिल्ह्यात ३३ पैकी १५ पदे आणि नंदुरबार जिल्ह्यात १६ पैकी ८ पदे रिक्त असल्याची माहिती देण्यात आली आहे.
६१५ पदांच्या भरतीकडे उमेदवारांचे लक्ष
धर्मदाय आयुक्तालयातील मोठ्या प्रमाणातील रिक्त पदांची संख्या लक्षात घेता सुमारे ६१५ पदांची नवीन भरती प्रक्रिया लवकरच जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सरकारी नोकरीच्या तयारीत असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची संधी ठरू शकते. मात्र भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरच पदनिहाय जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची प्रक्रिया, शुल्क, परीक्षा पद्धती आणि इतर अटी स्पष्ट होतील.
त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होण्याची प्रतीक्षा करत असतानाच संबंधित पदांसाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार तयारी सुरू ठेवणे फायदेशीर ठरणार आहे. अधिकृत जाहिरात आल्यानंतर त्यातील सर्व अटी आणि पदनिहाय माहिती तपासूनच अर्ज करणे आवश्यक राहील.
